शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मासळी विकून ऋषिकेश घ्यायचा शिक्षण!

By admin | Updated: September 30, 2015 00:10 IST

नियतीचा घाला : साकुर्डीच्या काटकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

तांबवे : गणेशोत्सवाच्या काळातच साकुर्डीच्या काटकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. शिक्षण घेऊन घरच्या परिस्थितीवर मात करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा ऋषिकेश नियतीने हिरावून नेला. त्यामुळे काटकर कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.साकुर्डी येथील ऋषिकेश अशोक काटकर (वय १७) हा गाडगे महाराज महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवार, दि. २५ रोजी बकरी ईदची सुटी असल्याने तो आपल्या पाच-सहा मित्रांसोबत सकाळी ११ वाजता कोयना नदीवर बंधाऱ्यानजीक असणाऱ्या ज्योतिबा पाणवठ्यावर पोहण्यासाठी गेला. नदीमध्ये पाणी कमीच होते. त्याला पोहताही येत होते. मित्रही नदीमध्ये पोहत असताना ऋषिकेश नदीमध्ये जास्त आत गेला. तेथे पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे ऋषिकेश घाबरला असावा. त्यानंतर गटांगळ्या खाऊन तो बुडाला. ऋषिकेश नदीत बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी घरी दिली. त्यावेळी युवक व ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. ऋषिकेश हा अशोक यांचा सर्वात मोठा मुलगा. ऋषिकेशच्या धाकट्या भावाचे नाव ऋतिकेश आहे. अशोक काटकर हे साकुर्डीतील अशोकराज कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बेताची असून शेतजमीनही अल्प आहे. त्यामुळे इतर कामे करून घर चालत होते. ऋषिकेश शिक्षण घेण्याबरोबरच अनेकवेळा बाजारामध्ये मासे विकत बसायचा. त्यातून कमावलेल्या पैशातून तो शिक्षण घेत होता. शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आणि घरची परिस्थिती बदलायची, असे अनेकवेळा त्याने आपल्या मित्रांना बोलून दाखविले होते. मात्र, नियतीने त्याला कुटुंबीयांपासुन हिरावून घेतल्याने त्याच्या आई-वडिलांसह लहान भाऊही खचला आहे. त्याच्या अचानकपणे निघून जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) अखेर जेवण राहिलंच!ऋषिकेश ज्यादिवशी पोहायला गेला, त्यावेळी आईने त्याला जेवणाचे ताट केले होते. आई त्याला जेवून जा म्हणून सांगत होती. मात्र, मी आंघोळ करून लगेच परत येतो. आलो की जेवण करतो, असे म्हणून ऋषिकेश घरातून निघून गेला तो परत आलाच नाही. आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.आधाराची गरजऋषिकेशचा लहान भाऊ ऋतिकेश हा इयत्ता ७ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तोही आपल्या दादाच्या जाण्याने खचला आहे. या कुटुंबाला आता आधाराची व मदतीची गरज आहे.