शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

पापण्यांमागच्या काळोख्या विश्वात सुखस्वप्नांचा उदय!

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

अनोखा सोहळा : दृष्टिहीन दाम्पत्याने सत्यशोधकी पद्धतीने सुरू केला सहप्रवास

राजीव मुळ्ये - सातारा --सातारा : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले आणि आद्यशिक्षिका सावित्रीबार्इंना वंदन करून अलका आणि संतोष यांनी रविवारी सत्यशोधकी पद्धतीने सहजीवनाला सुरुवात केली. एकमेकांना साथ देण्याबरोबरच परिवर्तनाच्या रस्त्यावरून चालण्याची शपथ घेतली. दृष्टिहीन वधुवरांच्या पापण्यांमागील काळोख्या विश्वात शेकडो स्वप्ने सामावली जात असताना सामाजिकदृष्ट्या नेहमी ‘डोळस’ राहणाऱ्या मोजक्या वऱ्हाडी मंडळींनी नवदाम्पत्यावर शुुभेच्छांचा वर्षाव केला.अलका आणि संतोषचं लग्न अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरलं. ‘सत्यशोध अंधकल्याण केंद्रा’च्या एकात्मिक शिक्षण प्रकल्पातून दहावीपर्यंत शिकलेली अलका धनगर समाजातली, तर मुंबईत कष्टानं स्वत:च्या पायावर उभा राहिलेला संतोष मराठा समाजातला. हा आंतरजातीय विवाह झाला सत्यशोधकी पद्धतीने. अलका चाळीस वर्षांची तर संतोष तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान. डोळसांच्या जगात ज्याला ‘विजोड’ म्हटलं गेलं असतं, अशा अनेक बाबींना दृष्टिहीन नवदाम्पत्य डोळसपणाने भिडलंय. कष्टानं, एकमेकांना आधार देत जीवनातल्या चढउतारांना सामोरं जाण्यास सरसावलंय. अलका बापूराव माने सातारा तालुक्यातल्या शेरेवाडी गावची. गावातल्या शाळेतच तिनं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. जोडीला ‘सत्यशोध’च्या प्रकल्पामधून ब्रेल लिपी आणि दृष्टिहीनांसाठीचं खास प्रशिक्षण ती घेत राहिली. दहावीनंतर मात्र शिक्षण घेणं तिला जमलं नाही. संतोष गणपत पवार मूळचा बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातल्या धोत्रा भणगोजी गावचा. पाचवीपर्यंत बुलडाण्याच्या अंध निवासी विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर सहावी-सातवीचं शिक्षण त्यानं अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर विद्यालयात घेतलं. अमरावतीच्याच केशरबाई लाहोटी विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन तो मुंबईला गेला. ‘एनएसडी’ या संस्थेमध्ये व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभा राहिला. संस्थेनं त्याला सीएसटीजवळ टेलिफोन बूथ सुरू करून दिलं. पार्ट टाइम टेलिफोन बूथ चालविण्या-व्यतिरिक्त संतोष मुंबईतल्या रेल्वेस्थानकांवर कटलरी विकतो. संंस्थेच्या माध्यमातून संतोषची अलकाशी ओळख झाली. दोघांनी प्रथम एकमेकांचे विचार ऐकून घेतले आणि मग संतोषनं अलकाला थेट मागणीच घातली. रविवारी त्यांनी साहचर्याला उत्साहात प्रारंभ केला. वऱ्हाडी मंडळींमध्ये अलका आणि संतोषच्या नातलगांसह नगराध्यक्ष सचिन सारस, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ, अशोक काळे, श्रीकांत के. टी., हेमा सोनी, विजय मांडके, चंद्रकांत कांबिरे, दिनकर झिंब्रे, सागर गायकवाड, विजय निंबाळकर, राजेश नारकर आदींचा समावेश होता. नव्या संसाराला अनेकांची मदतनवदाम्पत्याला संसारोपयोगी साहित्य पुरविण्यासाठी अनेकांनी मदत केली. माधव सोळसकर यांनी गॅस शेगडी, एलआयसीमधील स्वाती राऊत, न्यू इंडिया इन्शुरन्समधील हर्षल राजेशिर्के आणि इतरांनी दोन सिलिंडर कनेक्शनसाठी रक्कम दिली. धनराज लाहोटी यांनी नवरदेवाला सूट दिला. संसारोपयोगी साहित्यासाठी व्यंकटपुरा भजनी मंडळ, पुष्पा देशमुख, शारदा योग मंडळ, पौर्णिमा शहा, वृषाली कुलकर्णी यांनी मदत केली. मुंबईत उभयतांना स्थिरस्थावर करण्यासाठी प्रा. वृषाली मगदूम प्रयत्नशील आहेत.