शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत राडा

By admin | Updated: June 1, 2014 00:58 IST

सदर बझारमध्ये तलवारीने हल्ला : परस्परविरोधी गुन्हे दाखल

सातारा : येथील सदर बझारमध्ये शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास वरातीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा झाला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून सुमारे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत तलवार, कोयता आणि बाटल्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, येथील सदर बझारमध्ये दोन गटांत वरातीत नाचण्याच्या कारणावरून मारहाण झाली. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गणेश हणमंत भोसले (वय ४०, रा. सदर बझार) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सदर बझारमध्ये वरातीत नाचण्याच्या कारणावरून व बाचाबाचीतून तलवार, कोयता व बियरच्या बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोष रसाळ व शुभम विजय भोसले हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर संशयितांनी हॉटेलच्या काचा फोडून नुकसान केले आहे. गणेश भोसले यांच्या तक्रारीनुसार रितेश अरुण लाड, अरुण मोरे, पवन लाड, गुंड्या लाड आणि राहुल अरुण लाड यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दुसर्‍या बाजूने सारिका अरुण लाड (रा. सदर बझार) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हाडा कॉलनीत वरातीत नाचण्याच्या कारणावरून हाताने मारहाण करण्यात आली. त्यावेळी डोक्याला इजा झाली. त्यामध्ये रितेश लाड जखमी झाला आहे. सारिका लाड यांच्या तक्रारीनुसार अजय जाधव, तानाजी भणगे यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्हीही बाजूकडील चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार आणि घाडगे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)