शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत रंगला रिक्षावाल्याचा सेवानिवृत्ती सोहळा

By admin | Updated: September 4, 2016 00:35 IST

नियम बाजूला ठेवून जपला ॠणानुबंध : ३५ वर्षांची सेवा संपविताना डोळ्यात पाणी

साई सावंत-- सातारा  -मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्ती सोहळा तसा प्रत्येक शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, गेली ३५ वर्षे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज ने-आण करणाऱ्या रिक्षावाल्याचा सेवानिवृत्त समारंभ अत्यंत भावनिकरीत्या साजरा झाला. साताऱ्यातील नवीन मराठी शाळेत सर्वच्या सर्व म्हणजे ४५ शिक्षक अन् शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या रिक्षावाल्याकाकांना निरोप देण्यात आला. शाळेने सर्व नियम बाजूला ठेवून हा जपलेल्या या आगळ्या-वेगळ्या ऋणानुबंधांने ३५ वर्षांची सेवा संपविताना रिक्षावाल्याकाकांचे डोळे आनंदाश्रूने पाणावले.साताऱ्यात राहणारे चंद्रशेखर गाडगीळ १९८२ पासून रिक्षा चालवित आहे. ते गेल्या ३५ वर्षांपासून नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची आपल्या रिक्षामध्ये ने-आण करत होते. वार्धक्यामुळे आता हे काम करणे शक्य होत नसल्याने दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या पस्तीस वर्षांच्या अखंडित सेवेला पूर्णविराम दिला. या पस्तीस वर्षांच्या कालावधीत चंद्रशेखर गाडगीळ यांनी अनेक विद्यार्थ्यांना लहानाचे मोठे होताना पाहिले.आपल्या लाडक्या काकांचा यशोचित सत्कार व्हावा, या उद्देशाने नवीन मराठी शाळेचे मुुख्याध्यापक, ४५ शिक्षक-शिक्षिका, सेवक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गाडगीळ काकांना सपत्नीक एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. या शाळेने जपलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने गाडगीळ काकांसह उपस्थित प्रत्येकाला गहिवरून आले होते. ३५ वर्षांच्या कालावधीत ‘काका’ या ज्ञानमंदिरातील एक अविभाज्य घटक बनले.