शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत रिक्षा सुसाट

By नितीन काळेल | Updated: May 29, 2023 11:51 IST

वरदविनायक पॅनलची सत्ता : विरोधी ‘श्री अष्टविनायक’चा १५-० ने धुरळा

- नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकार सहायक संस्था निवडणुकीत वरद विनायक पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत विरोधी श्री अष्टविनायक पॅनलचा धुरळा उडवला. विशेष म्हणजे या सर्व जागा ८० ते १०० मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत. तर विजयी झालेल्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह हे रिक्षा होते.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली. एकूण १५ जागांसाठी मतदान झाले. यासाठी ६२५ मतदार होते. त्यामधील ५८८ जणांनीच हक्क बजावला. या निवडणुकीत वरद विनायक पॅनलचे सुनील कापसे, श्रीरंग गोडसे, राकेश जाधव, प्रशांत पवार, किरण पाटणे, प्रशांत भोईटे, सुनील भोसले, प्रशांत साळुंखे, संग्रामसिंह साळुंखे, सागर साळुंखे, तुकाराम खाडे, अविनाश कवळे, अरुण गुरव, हेमलता ग्रामोपाध्ये आणि राखी घोरपडे हे विजयी झाले.

वरदविनायक पॅनलचे नेतृत्व अमोल पवार, दिनकर चव्हाण, प्रशांत तुपे, सागर साळुंखे, मारुती जाधव, विलास जाधव, तुषार निकम, रामचंद्र सपकाळ आदींनी केले होते.सागर साळुंखेंचा चाैकार अन् गुलालाची उधळण...पतसंस्थेचे अध्यक्ष सागर साळुंखे होते. यावेळी त्यांनी पतसंस्थेची चाैथ्यांदा निवडणूक लढविली आणि विजयीही झाले. त्यामुळे त्यांनी सलग चाैकार ठोकला आहे. तर, या विजयानंतर वरद विनायक पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.