दरम्यान, वनविभागाने वनक्षेत्रास कुंपन करून घ्यावे. त्यामुळे वन्यप्राणी बाहेर पडणार नाहीत. आणि शेतकऱ्यांना दरवर्षी होणारा नाहक त्रास व नुकसान बंद होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
आचरेवाडी परिसरात रब्बी हंगामात शाळू, हरभरा, गहू या पिकांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय काहीजण बोअरवेलच्या साहाय्याने बागायत माळव्याची पिके घेत असतात. मात्र, दरवर्षी रानगवे, रानडुकरे, वानरे या प्राण्यांचा त्रास होतो. त्यामुळे चांगले हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी खचून गेले आहेत. शेतीसाठी खर्च करून व मेहनत करून उपयोग होत नाही. प्रत्येकवर्षी पीक नुकसानीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. वनविभागाच्या क्षेत्रास कुंपन घातले तर हा त्रास कमी होऊन शेतीचे उत्पादन घेता येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आचरेवाडी परिसरातील शेतकरी नारायण आचरे, शंकर आचरे, एम.बी. आचरे, पांडुरंग आचरे, शंकर शेवाळे, तानाजी आचरे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी आचरे, श्रीकांत आचरे, भीमराव भिंगारदेवे यांनी वनविभागाच्या ढेबेवाडी कार्यालयात जाऊन आपल्या व्यथा मांडल्या.