शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

क्रांतीदिनी ६५० आंदोलक ताब्यात

By admin | Updated: August 9, 2016 23:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटना, कामागार संघर्ष समिती आणि अंगणवाडी सेविकांचे मोर्चे

सातारा : सातारा शहराला देशप्रेम, स्वातंत्रलढ्याची परंपरा आहे. या लढवय्या जिल्ह्यात मंगळवारी (दि. ९ आॅगस्ट) आॅगस्ट क्रांतिदिन ‘आंदोलन डे’ म्हणून साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतन श्रेणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले. त्यानंतर पालिका कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनीही मोर्चा काढला. त्यामुळे हा क्रांतीदिन ‘आंदोलन डे’ ठरल्याची चर्चा होती.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नेहमीपेक्षा पोलिस बंदोबस्त जरा जास्तच होता. क्रांतीदिनी आंदोलन करणाऱ्या संघटनांनी तसा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिस कायदा व सुवस्था राखण्यासाठी तयारीत होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात ४० ते ५० कर्मचाऱ्यांनी हुतात्मा स्मारकापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.याठिकाणी वेतन श्रेणी, सेवाशर्ती लागू कराव्यात, अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन केले. ९० टक्के करवसुलीची अट कर्मचाऱ्यांवर न लादता वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे, केंद्रीय कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना परिमंडळ निहाय दरमहा दहा हजार व बारा हजार आणि पंधरा हजारांप्रमाणे वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)पोलिस मैदानावर सुटकाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने जेलभरो आंदोलन केले. पोलिसांनी दोन्ही संघटनेतील आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅनमधून शहर पोलिस ठाण्यात आणले. याठिकाणी सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिस परेड मैदानावर सोडण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी आंदोलक ताब्यात घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल.अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल कराकामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सातारा जिल्हा नगरपरिषद, नगरपंचायत, कामगार संघर्ष समितीच्या वतीने सातारा पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाढत्या महागाईला आळा घाला. किमान वेतन कंत्राटदार, कामगारांसहीत १८ हजार द्यावे, अनुकंपाच्या जागा त्वरित भराव्यात, अनुकंपाच्या जाचक अटी शिथिल करून सेवेत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकरी अश्विन मुदगल आणि मुख्याधिकारी शंकर गोरे यांना देण्यात आले.