मसूर : कऱ्हाड तालुक्यातील मसूर-कोरेगाव रस्त्यावर वाण्याचीवाडी फाट्यापासून जवळच असलेल्या खोलवडा रस्त्यावरून ऊस भरून कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर-ट्रॉली ओढ्यातच पलटी झाली. त्यामुळे ट्रॉलीतील ऊस ओढ्यात पडला. परिणामी नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, उसाने भरलेला ट्रॅक्टर ऊस घेऊन सह्याद्री कारखान्याकडे निघाला होता. ट्रॅक्टरचे मागील बाजूचे चाक निघून पडल्याने ट्रॉली पलटी झाली. त्यामुळे ट्रॉलीतील संपूर्ण ऊस ओढ्यात पडल्याने नुकसान झाले आहे. ओढ्यातील ऊस काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याठिकाणी खोल असणाऱ्या ओढ्यावर भराव करून सुमारे सव्वा मीटर रस्ता भरून घेतला आहे. परंतु भरावावर डांबरीकरण नसल्यामुळेच ट्रॅक्टर पलटी होऊन नुकसान झाले. (वार्ताहर)
कऱ्हाड तालुक्यात उसाची ट्रॉलीची पलटी
By admin | Updated: May 17, 2015 01:26 IST