शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 10:58 IST

राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याप्रांताधिकारी स्वाती देशमुख यांची सांगलीला बदली

सातारा : राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.सांगलीच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांची साताऱ्याच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोलापूर येथील उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांची फलटणचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका ठाकूर यांची साताऱ्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुणे येथील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्राकार यांची साताऱ्यात पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून तर सांगली येथील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी-मुसळे यांची साताऱ्यात रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.कऱ्हाड येथील प्रांताधिकारी हिंमत खराडे यांची पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षकपदी नेमणूक झाली. त्यांच्या जागी पुणे येथील सतीश राऊत हे आले आहेत. सतीश राऊत हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील अध्यक्षांचे सचिव या पदी सध्या कार्यरत आहेत.

राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने बदल्यांचे शासन आदेश नुकतेच काढण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी हिंमत खराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीशी संबंधित पदावर करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी तत्काळ आपल्या नेमणुकीच्या जागी पदभार स्वीकारावा, असे पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :TransferबदलीSatara areaसातारा परिसरGovernmentसरकार