शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेठरे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय ऊर्फ आबा मोहिते यांची निवड ...

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय ऊर्फ आबा मोहिते यांची निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड पार पडली. सरपंच सुवर्णा कापूरकर अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बिपिन ऊर्फ सनी मोहिते यांनी अध्यक्ष निवड ग्रामस्थांच्या सहमतीने व्हावी, असे नमूद करून याबाबत मतदान घेण्याची सूचना मांडली. धनंजय मोहिते यांनी दत्तात्रय मोहिते व विक्रमसिंह मोहिते हे दोघेही समाजकार्यात अग्रेसर असल्याचे सांगून उपस्थित ग्रामस्थांना हात उंचावून मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर दत्तात्रय मोहिते यांच्या बाजूने हात उंचावून सर्वानुमते मतदान झाले. ग्रामविकास अधिकारी डी. एम. करचे यांनी दत्तात्रय मोहिते यांच्या बाजूने ग्रामस्थांचा सर्वानुमते पाठिंबा असल्याने त्यांच्या निवडीची घोषणा केली.

येरवळेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड बिनविरोध

कऱ्हाड : येरवळे (ता. कऱ्हाड) येथील ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक के. पी. यादव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. सरपंच गीतांजली यादव, उपसरपंच अशोक यादव, ग्रामपंचायत सदस्य कविता यादव, मंगल कुंभार, संजय यादव, राहुल राऊत, राजेंद्र वाघमारे, तानाजीराव यादव, विकास यादव, महेश यादव, संदीप लोकरे, अण्णासाहेब यादव यांनी चर्चेत भाग घेतला. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बोडके यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले. राष्ट्रीय पेयजल योजनेसह अन्य विविध विकासात्मक मुद्द्यांवर ग्रामसभेत चर्चा झाली. आनंदराव लोकरे यांनी आभार मानले.

बापूराव पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड

कऱ्हाड : उंडाळे (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीचे उपसरपंच बापूराव पाटील यांची सरपंच परिषदेच्या कऱ्हाड दक्षिण उपाध्यक्षपदी निवड झाली. परिषदेचे मार्गदर्शक शंकरराव खापे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश इंगवले यांच्याहस्ते त्यांना पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जावेद मुल्ला, उदय पाटील, ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, अधिकराव पाटील, धनाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील, दादासाहेब पाटील, अजित कदम, माधव अंबवडे, प्रमोद पाटील, अमोल पाटील, मयुर पाटील, सत्यजित पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

एसएमएसमध्ये विद्यार्थी बनले वर्गशिक्षक

कऱ्हाड : येथील एसएमएस इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागाने अनोखा उपक्रम राबविला. ऑनलाइनद्वारे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून ज्ञानदान करण्याची संधी देण्यात आली. सर्व शिक्षकांच्या सहमतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वाळिंबे यांनी मार्गदर्शन केले. ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते.