शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

विस्कटलेल्या वस्तीत मरगळलेली मने...

By admin | Updated: December 21, 2015 00:56 IST

गावकुसाबाहेरच्या वस्त्या बकाल : खंडाळा तालुक्यातील मिरजे, मोर्वे, खंडाळा येथील वस्त्यांवर वीज, पाणी, गटारे अशा सुविधांची गैरसोय--शहरं स्मार्ट; गावकुसाबाहेरचं काय?पण

दशरथ ननावरे -- खंडाळा -उगवत्या सूर्याबरोबर गावच्या वेशीतून बाहेर पडलो. समोरच गावकुसाबाहेरच्या वस्तीचं विस्कटलेलं रूप पाहायला मिळालं. गावच्या बाजूचा डांबरी रस्ता सोडून कच्च्या रस्त्यानं पुढं निघालो. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यातून मार्ग काढत आजूबाजूची परिस्थिती न्याहाळत होतो. एकीकडं शहरं स्मार्ट होत असताना गावकुसाबाहेरच्या वस्त्या मात्र दुर्गंधी, दारिद्र्याच्या वेढ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले.सकाळच्या प्रहरी वस्तीतल्या एका मोडकळीस आलेल्या पडवीत एक महिला चुलीत लाकडं पेटविण्याचा प्रयत्न करीत होती. धुपणाऱ्या लाकडाला फुंकणीने वारा घालताना तिच्या डोळ्यातल्या पाण्याला मात्र वाट मिळत होती. आयुष्यभर चुलीशी संसार थाटलेल्या तिच्या हातांना गॅस शेगडीचा स्पर्श कधी होणार, हाच प्रश्न तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.या वस्तीत अनेक घरांपुढं शौचालयं बांधलेली पण वापरात क्वचितच. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था. गावात मात्र निर्मल ग्रामच्या पाट्या अशी विसंगतीही दिसली. कोपऱ्यावरच टोपल्या वळायला सुरुवात केलेल्या माणसाजवळ चौकशी केली तर ‘वर्षानुवर्ष असं खितपत जीवन जगावं लागतंय. पाच वर्सातनं कवातरी एखादं काम वस्तीत होतंय. शासन मात्र गांधारीची भूमिका घेऊन मूग गिळून आहे. आला दिवस पुढं ढकलायचा, एवढंच आमच्या हाती. शेवटी नशीब, दुसरं काय?’ अनेक पावसाळे बघितलेल्या त्या माणसानं वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या वस्तीचं चित्र मांडलं. त्यांच्या बोलण्यात शासन, प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर दिसत होता.आधुनिक सुधारणांचा डांगोरा पिटत असताना दलित वस्त्यांवरचं गावोगावचं हे चित्र मात्र डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. सार्वजनिक नळावर रोजच्याच कुरबुरीवस्तीत रस्त्याकडेला सार्वजनिक नळावर पाण्यासाठी चेपलेल्या भांड्यांची रेलचेल दिसली. घरात नळ घेण्याची ऐपत नसणारी अनेक कुटुंबे या वस्तीत असल्याचे जाणवले. पाणी भरताना भांड्यांच्या खडखडाटात बायकांच्या कुरबुरीचाही आवाज लक्ष वेधून घेत होता. ‘देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली; पण आपल्या वस्तीच्या पाणी, रस्त्यावरच्या लाईटचा प्रश्न पुढाऱ्यांना कधी दिसणार कुणास ठावूक?’ बायकांमधील हा संवाद मात्र वर्षानुवर्षे दलितवस्तीतील सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं अधोरेखित करत होता. ‘लोकमत टीम’घेणार रोज एका दलित वस्तीचा शोध...देशातील काही मोठी शहरं स्मार्ट होत असली तरी गावकुसाबाहेर असलेल्या दलित वस्त्या मात्र असुविधांच्या विळख्यात सापडत चालल्या आहेत. म्हणूनच आजपासून ‘लोकमत टीम’ मारणार आहे प्रत्येक तालुक्यातील एका दलित वस्तीत फेरफटका...