शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

औषधांबाबतचे नियोजनची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्‌भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्‌भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कामकाज पूर्ण करण्याकामी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियुक्ती आदेशान्वये केली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविडबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असून यासाठी पुरेशा प्रमाणात औषध साठा असणे आवश्यक आहे. याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व त्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.

जवंजाळ यांनी पार पाडावयाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : कोविड-१९ संक्रमित रुग्णांची रुग्णालयातील दैनंदिन दाखल संख्येबाबत सर्व हॉस्पिटल प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवावा. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तत्काळ नियोजन आखणे. कोविड-१९ चे औषधोपचार न मिळाल्याचे कारणाने मृत्यू होणार नाहीत, यासाठी औषध वितरण व्यवस्था सुरळीत पार पाडली जाईल याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. कामकाज हे आपल्या स्तरावरुन आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्या सहायाने पार पाडावे, असेही आदेशात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमूद केले आहे.