सातारा : कृषी व सहकार राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या ‘आम्ही भारतीय’ संकल्पनेतून भारती विद्यापीठाच्या विविध शाखांमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून साताऱ्यातील डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रियांका त्रिमुखे उपस्थित होत्या. शिबिरात जमा झालेला रक्तसाठा जिल्हा रुग्णालयाला देण्यात आला. प्रभारी मुख्याध्यापिका व गाइड कॅप्टन अरुंधती गुजर यांनी मार्गदर्शन केले. रमा निपाणे यांनी सूत्रसंचालन केले. संध्या राव यांनी आभार मानले.
फोटो
०३आयरन
साताऱ्यातील डाॅ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमीत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रियांका त्रिमुखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुंधती गुजर, रमा निमाणे उपस्थित होत्या.