कोपर्डे हवेली ता. कऱ्हाड येथे शेती पंपाच्या वीज बिल संदर्भात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे , शाखा अधिकारी बद्रायणी यांची उपस्थिती होती.
राख म्हणाले, सप्टेंबर २०२० पर्यंतचे वीज बिलास पन्नास टक्के सवलत दिली असून ही योजना २०२३ पर्यंत चालू राहणार आहे. २०२०-२१ मध्ये भरल्यास पन्नास टक्के. २०२१-२२ मध्ये भरल्यास तीस टक्के तर २०२२-२३ मध्ये भरल्यास वीस टक्के सवलत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत वीजबिले भरुन संपूर्ण सवलतीचा लाभ घेतला पाहिजे.
यावेळी शेतकरी भास्कर चव्हाण यांनी वीजबिले वेळेत मिळत नाहीत त्यामुळे ती वेळेत भरता येत नसल्याचे सांगून यापुढे तरी शेतकऱ्यांना वीजबिले वेळच्या वेळी मिळावी अशी मागणी केली.
फोटो ओळ.
कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथेे शेतकऱ्यांच्या वीज बिलांचे शंकेचे निरसन करताना अभिमन्यू राख व इतर.