शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुभानमंगल किल्ल्याच्या जागी स्मारक उभारण्याचा ठराव

By admin | Updated: December 25, 2016 23:41 IST

पंचायत समिती सभा : चौपदरीकरणाचे काम गतीने करण्याची मागणी

खंडाळा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली लढाई झालेले ऐतिहासिक ठिकाण असलेल्या शिरवळच्या ‘सुभानमंगल’ किल्ल्याच्या जागी राज्य संरक्षित स्मारक उभारण्यात यावे, असा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील विविध विकासकामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावावीत,’ अशा सूचना सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनी केल्या. खंडाळा पंचायत समितीची मासिक सभा सभापती नितीन भरगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सारिका माने, सदस्य दीपाली साळुंखे, रमेश धायगुडे-पाटील, अनिता शेळके, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी बापूसाहेब शेळके, गटविकास अधिकारी दीपा बापट आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे ठप्प आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोज एकाचा तरी जीव जातोच, चौपदरीकरणाचे काम तातडीने झाल्यास भविष्यात जीवितहानी कमी होणार नाही. यावर सभेत चर्चा करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन होऊन त्यांना तातडीने मोबदला द्यावा यासाठी महसूल व पुनर्वसन अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्य रमेश धायगुडे यांनी केली.तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती प्रक्रिया नियमाप्रमाणे राबविण्यात यावी तसेच यापुढे कडबाकुट्टी, सायकल, शिलाई मशीन या वस्तू लाभार्थींना न देता त्यांनी खरेदी करावयाच्या आहेत. त्याची अनुदान रक्कम खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती देण्यात आली. शिरवळ येथील अंबिकामाता मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा, अशीही मागणी करण्यात आली तसेच शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. (प्रतिनिधी)