शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शंभर फुटी रस्ता रद्द करण्याचा ठराव

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

नगरसेवकही आक्रमक : रस्ता रुंदीकरणाचा विषय समन्वयाने सोडवावा

कऱ्हाड : शहरातील दत्त चौक ते मार्केट यार्ड हा बहूचर्चित शंभर फूट रस्ता न करण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. शंभर फूट रस्ता करण्यासाठी या रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी तीव्र विरोध दर्शविला. याविरोधात लढा देण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करून संबंधितांनी पालिकेस निवेदन दिले होते. यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे होत्या. बांधकाम सभापती राजेंद्र माने यांनी दत्त चौक ते मार्केट यार्ड या शंभर फूट रस्त्याबाबतची सूचना मांडली. या विभागात अनेक रस्ते गरजेनुसार विकसित झाले आहेत. सध्या हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जमीन संपादन करताना अनेक इमारती पाडाव्या लागतील. या इमारतीच्या नुकसान भरपाईपोटी द्यावी लागणारी रक्कम ही कोट्यवधींच्या घरात जाईल. ही गोष्ट परवडणारी नाही. याशिवाय या रस्त्याच्या रुंदीकरणास नागरिकांचा विरोध आहे. याबाबतचे निवदेन पालिकेस दिले आहे. रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, असे राजेंद्र माने यांनी सांगितले. या मागणीला नगरसेवक प्रमोदसिंंह कदम यांनी अनुमोदन दिले. उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंंह यादव, लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील, ‘जनशक्ती’चे विनायक पावसकर यांनी मत मांडले. शंभर फूट रस्त्याचे प्रकरण कुठेही न घडणारे, असे प्रकरण असल्याची टीका सुभाष पाटील यांनी केली. रस्त्याच्या रुंदीकरणाचा विषय समन्वयाने सोडविण्यात यावा, यासाठी नगरसेवकांनी एकत्र निर्णय घेतला पाहिजे, असे पावसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) रेषा मुंबईत की मलकापुरात मारल्या ?रस्ता रुंदीकरणाचा विषय समोर आल्यानंतर मंत्रालयात याचा निर्णय घेतला गेला असला तरी नकाशात हा रस्ता किती फुटाचा करावा, याबाबतच्या रेषा मंत्रालयातील केबिनमध्ये की मलकापुरात ओढल्या गेल्या, हा संशोधनाचा भाग आहे, अशी टिप्पणी सुभाष पाटील यांनी केली.