शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

आरक्षण द्या... अन्यथा परिणामांना सामोरे जा

By admin | Updated: June 20, 2014 00:29 IST

मराठा आरक्षण मेळावा : संभाजीराजे भोसले यांचा इशारा

साखरवाडी : ‘आपला प्रवास बहुजन समाज एकत्र आणण्यासाठी आहे. ही भूमिका स्पष्ट असताना जाती-जातीतील समाज एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या पुढाऱ्यांना ती रुचत नाही. ज्या समाजाला आरक्षण दिले आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाची गरज असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पााहिजे, अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये परिणामांना सामोरे जा,’ असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना दिला.साखरवाडी, ता. फलटण येथे भाजी बाजार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, शिवरुपराजे खर्डेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला खराडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, डी. के. पवार, बी. के. निंबाळकर, बबनराव निकम, विशाल शिंदे, नरेंद्र भोईटे, जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय सदस्य कमलाताइ् पवार, जितें्र साळुंखे-पाटील, शारदा पवार, सुमनताई भराडे, अर्चना पवार आदी उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी आयोजित सभांमध्ये जातीभेद संपला नसल्याचे जाणवले. तो संपुष्टात आणला पाहिजे. तरुणांना आवाहन करताना संभाजीराजे म्हणाले, युवकांनी इच्छाशक्तीतून नेतृत्वगुण दाखवले पाहिजे.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागेल.यावेळी धनंजय साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, नानासाहेब पवार, डी. के. पवार, नीलेश जगताप आदींचे मार्गदर्शन केले. यावेळी संभाजीराजेंचे सुरवडी येथे स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते सुरवडी येथील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्याला हार घालून सुरवडी ते साखरवाडी महारॅली काढण्यात आली. कार्यक्रमास अरूण गायकवाड, जितेंद्र साळुंखे-पाटील, सुशांत निंबाळकर, अशोकशेठ सस्ते, उत्तमराव भोसले, राजेंद्र झेंडे, पोपटराव भोसले, विक्रमसिंह भोसले, समीर भोसले, दिगंबर गरूड, महेश बर्गे, युवराज रणवरे, नितीन शिंदे, संजय निगडे, सुरज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर)