खटाव : खटावमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शिवाजी चौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी दुष्काळात खटावमध्ये मोफत पाणी वाटप करणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला, तर ग्रामपंचायतीच्यावतीने सैनिक भवन उभारण्यासाठी जागा देणार असल्याचे सरपंच नंदकुमार वायदंडे यांनी जाहीर केले. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, राहुल पाटील, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, मंडल अधिकारी मोहन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य आजी, माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, खटावमध्ये विविध ठिकाणी झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात येथील यशवंत विकास सोसायटीत माजी सरपंच दीपक विधाते, शहाजीराजे महाविद्यालयात प्रा. आर. के. साखरे, लक्ष्मीनारायण स्कूलमध्ये मुख्याध्यापक बंडोपंत खोत, जि. प. मराठी शाळेत केंद्रप्रमुख सुरेखा पवार यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात केले.
कॅप्शन :
खटावमध्ये ग्रामपंचायतीसमोर शिवाजी चौकामध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित सरपंच, उपसरपंच व मान्यवर.
(आवश्यक असल्यास)