शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांवर गुन्हा नोंद करा

By admin | Updated: December 26, 2014 00:51 IST

अजिनाथ केवटे : म्हसवड पालिका जागेचा नगरसेविकेच्या पतीकडून वापर

सातारा : ‘माणगंगा नदीतून परवानगी नसताना वाळूउपसा करण्यात आला आहे. जबाबदार असणाऱ्या शासकीय अधिकारी आणि वाळू माफियांवर फौजादारी गुन्हा नोंद करावा. तसेच म्हसवडच्या नगरसेविकेच्या पतीने पालिकेच्या मालकीची सुमारे तीन एकर जागा वापरण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही प्रकरणांतील संबंधितांच्या विरोधात कारवाई करावी,’ अशी मागणी अजिनाथ केवटे यांनी केली आहे.येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केवटे म्हणाले, ‘माणगंगा नदीतील व नदीला मिळणाऱ्या ओढ्यात गेल्या चार वर्षांपासून वाळू उचलण्याची परवानगी नाही. तरीही येथील सुमारे पाचशे कोटींच्या वाळूची चोरी झाली आहे. याला सर्वस्वी शासकीय अधिकारी जबाबदार आहेत. या विरोधात म्हसवड तलाठी कार्यालयापुढे दोन दिवस उपोषणही केले. प्रांताधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापुढे काहीही झाले नाही. वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच माण तहसीलदार यांच्या गाडीच्या चालकाच्या फोन नंबर व संपत्तीची चौकशी करावी. गुन्हा नोंद करावा. यासाठी मी दि. ५ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे, असेही केवटे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)तीन एकर जागेवर ताबा...म्हसवड शहराच्या हद्दीत पालिकेच्या मालकीच्या सिटी सर्व्हे नंबर ३५५ मध्ये बाळकृष्ण सदाशिव पिसे यांची वखार व लाकूड कापण्याची मशीन आहे. ही जागा अंदाजे दोन ते तीन एकर आहे. बाळकृष्ण पिसे हे नगरसेविका निर्मला पिसे यांचे पती आहेत. शासकीय जागेचा वापर होत असताना मुख्याधिकारी काहीही कारवाई करीत नाहीत. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. तीस दिवसांत याबद्दल कार्यवाही न झाल्यास पालिकेसमोर उपोषण करणार आहे, असा इशाराही अजिनाथ केवटे यांनी दिला आहे. याबाबतही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.