शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेणुकादेवी नवरात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: October 13, 2015 21:53 IST

चांदवड : भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी सुविधा

चांदवड : येथील कुलस्वामिनी रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. यावेळी घटस्थापना व महाआरती न्यायमूर्ती आर. बी. गिरी, न्यायमूर्ती एस. बी. तोडकर यांच्या हस्ते झाली. भाविकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होती. बुधवारी (दि. १४) राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. मंदिरात होमहवन, दररोज पहाटे ५ वाजता महाभिषेक, पालखी मिरवणूक, रात्री महाआरती, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रोत्सव काळात विविध प्रकारची दुकानेही शिस्तबद्ध पद्धतीने थाटण्यात आल्याने परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यावर्षी ठिकठिकाणी क्लोज सर्किट सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवासाठी सोमा टोलवे कंपनी, वीज वितरण कंपनी, आबड-लोढा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पोलीस स्टेशन, मेडिकल कॉलेज या संस्थांच्या वतीने स्वयंसेवक घटी बसणाऱ्यांना व भाविकांना मदत करीत आहेत. यात्रोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक मधुकर वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दल पुरुष, महिला कर्मचारी कार्यरत आहेत. नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, तान्हाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, नारायण कुमावत, खंडू अहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार व किसन बल्लाळ, जगन्नाथ राऊत, संतोष देवरे, शेरू ब्रदर्स, दीपक कुमावत व चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)