शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

मुख्याधिकारी हटाव... कऱ्हाडात ठराव!

By admin | Updated: September 11, 2015 21:17 IST

चौकशीची मागणी : गैरकारभाराचा ठेवला ठपका; पालिकेच्या विशेष सभेत एकमताने मंजुरी

कऱ्हाड : वेळेवर काम न करणे, खुलासा मागितल्यास तो नीट न देणे, बांधकाम परवाने दोन-तीन महिने न देणे, शहराच्या हिताला बाधा आणणे आदी आरोप ठेवत येथील पालिकेच्या विशेष सभेत मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या गैरकारभाराबाबत विचारविनिमय करणे, हा एकच विषय होता. त्यावर सुमारे दीड तास घमासान होऊन हा मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराच्या चौकशीचा व बदलीचा ठराव एकमुखाने करण्यात आला. नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्या साळुंखे अध्यक्षस्थानी होत्या. नगरसेवक प्रमोद कदम यांनी या मूळच्या ठरावाचे वाचन केले. त्यात मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी गेल्या दोन वर्षांत पदाधिकारी व कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय न साधत एकतर्फी कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहराचा विकास रखडला आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे शहराचा विकास होईल, असे वाटत नाही. मनमानी कारभार करणाऱ्या अशा अधिकाऱ्याची बदलीच करणे उचित होईल, असे मत मांडले. त्याला मोहसीन आंबेकरी यांनी अनुमोदन दिले, तर उपस्थित सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी त्याला एकमताने मुखसंमती दिली व ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर नगरसेवक अ‍ॅड. मानसिंगराव पाटील यांनी मुख्याधिकारी रोडे यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘मुख्याधिकारी हा पालिकेचा आत्मा असतो; पण मीच सर्वज्ञ आहे, पालिकेतील लोकप्रतिनिधींना काही कळत नाही, अशा आविर्भावात त्यांनी गेली दोन वर्षे कारभार केला आहे. शहरातील रस्त्यांची झालेली चाळण हीच त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. आम्ही केलेल्या ठरावाचा त्यांनी सन्मानाने स्वीकार करावा,’ असे त्यांनी सांगितले. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, ‘शंभर अपराध भरल्यानंतर लोकप्रतिनिधींनी सोडलेले हे सुदर्शनचक्र आहे. मुख्याधिकाऱ्यांची यातून सुटका नाही.’ केवळ मलकापूर नगरपंचायतीचे अतिक्रमण व पटेल यांच्या बांधकामाला परवानगी न देणे या दोन गोष्टींमुळे हा ठराव केलेला नसल्याचे सांगतानाच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारींचा पाढाच वाचला. (प्रतिनिधी) उपकारांची परतफेड नाही ना?‘दोन वर्षांपूर्वी कोणाच्या तरी कृपेने तुम्ही कऱ्हाडचे मुख्याधिकारी झालात. त्या उपकारांची परतफेड आता बांधकाम परवाना न देऊन तुम्ही करत नाही ना,’ असा सवाल करतानाच ‘पटेल यांना बांधकाम परवाना न देण्यात तुमचा इंटरेस्ट काय आहे,’ असा चिमटा सुभाष पाटील यांनी प्रशांत रोडे यांना काढला. मुख्याधिकारी शांतच सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केलेली विशेष सभा बारा वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. पण मुख्याधिकारी प्रशांत रोडे साडेअकरा वाजण्याअगोदरच सभागृहात हजर होते. त्यानंतर सुमारे दीड तास फक्त त्यांच्या विरोधातच सर्वांचे बोलणे सुरू होते. अनेकजण आक्रमक झाले होते; मात्र मुख्याधिकारी रोडे यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता दीड तास हे सर्व ऐकणेच पसंत केले. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. शासनाने घालून दिलेल्या चौकटीत राहूनच मी काम केले आहे. कोणाचीही अडवणूक केलेली नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास दिलेला नाही. माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत; मात्र जर लोकप्रतिनिधींना माझे काम पसंतच नसेल, तर शासन देईल त्या ठिकाणी मी काम करण्यास तयार आहे. - प्रशांत रोडे, मुख्याधिकारी, कऱ्हाड नगरपरिषद