शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगावामध्येही झाली होती रेमडेसिविरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

फलटण : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्‍शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण ...

फलटण : रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या टोळीकडून फलटण तालुक्यात या अगोदरही इंजेक्‍शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे काही इंजेक्शन विकली होती. त्यातील दोन इंजेक्शन सध्या पोलिसांकडे जमा आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

फलटण शहर पोलिसांनी वृत्तपत्रामध्ये या गुन्ह्याच्या तपासकामी, कोणाची काही तक्रार असल्यास संपर्क करावा, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन केले होते. केलेल्या आवाहनानुसार हिंगणगाव (ता. फलटण) येथील एक साक्षीदारांनी गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीकडून स्वतःचे नातेवाईक कोरोनाग्रस्त व उपचार घेत असताना मोठ्या किमतीने रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली होती. परंतु, संबंधित रुग्णाचे उपचारादरम्यान निधन झाल्याने, शिल्लक राहिलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या दोन बाटल्या या तपासकामी त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर केलेल्या आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती फलटण पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित सुविधा हॉस्पिटलचा कंपाउंडर सुनील कचरे (वय ३८), अजय सुरेश फडतरे (३४, व्यवसाय शेती, रा. पिंप्रद, ता. फलटण), प्रवीण दिलीप सापते (३६, रा. घाडगेवाडी, ता. फलटण) आरोपी निखिल अनिल घाडगे (३१, रा. अनपटवाडी, ता. खटाव) यांना गुन्ह्याच्या कामी अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी करता, चौकशीमध्ये आरोपी अमित विजय कुलकर्णी (वय ४५, रा. ७० बी /३, आदर्श कॉलनी, गोडोली, सातारा), रवींद्र रामचंद्र लाहोटी (वय ३२, रा. तारळे, ता. पाटण), मानसी मेडिकल तारळेचे मालक अरुण शामराव जाधव यांना अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ व पथक हे करीत आहेत.