शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण, लूट प्रकरणातील संशयितांची रेखाचित्रे जारी

By admin | Updated: June 22, 2015 22:21 IST

पोलीस असल्याचे सांगून लुटले होते पावणेसहा लाख

सातारा : गोडोली येथून एकाचे अपहरण करून त्याला शिवीगाळ आणि मारहाण करून लूट केल्याप्रकरणी हव्या असणाऱ्या तीन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. संशयितांनी पाच लाख ८९ हजारांचा ऐवज लांबविला होता.याप्रकरणी अभिजित संभाजीराव घोरपडे (वय ३९, रा. सुंदरा गार्डन, विसावा नाका, सातारा) यांनी फिर्याद दाखल केली होती. दि. १३ रोजी चार अनोळखी इसमांनी आपण ‘क्राइम ब्रँच’चे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून घोरपडे यांना दटावणी केली. ‘तुम्हाला चौकशीसाठी आॅफिसमध्ये बोलावले आहे,’ असे सांगून कारमध्ये बसविले. नंतर लिंब खिंड, रहिमतपूरमार्गे औंध (ता. खटाव) आदी ठिकाणी नेऊन त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. त्यांना हाताने तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड, वस्तू संशयितांनी काढून घेतली. संशयितांनी घोरपडे यांची पाच लाखांची कारही (एमएच ११ बीएच ६९६२) जबरदस्तीने नेली. याखेरीज ३५ हजारांची सोन्याची साखळी, १७ हजारांचे साडेआठ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट, १० हजारांची पाच ग्रॅमची अंगठी, पाच हजारांचा मोबाइल, रोख २८०० रुपये आणि बँकेचे क्रेडिट कार्डही संशयितांनी हिसकावले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून संशयितांनी वीस हजारांची रोकड काढल्याचा किंवा तेवढ्या रकमेची खरेदी केल्याचा संशय आहे.संशयितांपैकी दोघेजण एकमेकांना ‘अमोल’ आणि ‘अमर’ नावाने हाक मारत होते. त्यातील अमर याने गॉगल घातला होता, तर अमर कार चालवीत होता, असे पोलिसांना चौकशीदरम्यान आढळून आले आहे. संशयितांच्या वर्णनावरून शहर पोलिसांनी त्यातील तिघांची रेखाचित्रे तयार केली आहेत. (प्रतिनिधी)