शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बंद देवळातून हनुमान मुक्त करा!

By admin | Updated: August 16, 2015 21:36 IST

गोवे : ग्रामस्थांची मागणी; नवीन इमारत बांधूनही विद्यालय सोडेना मंदिराचा ताबा

सातारा : शाळेसाठी मंदिराची इमारत वापरण्याचे प्रकार ठिकठिकाणी आढळतात; मात्र विद्यालयासाठी नवीन इमारत बांधूनही मंदिराचा ताबा सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे हनुमानाला बंद देवळातून मुक्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. गोवे (लिंब, ता. सातारा) येथे त्याबाबतचा श्री हनुमानाच्या नावाने फलकही स्वातंत्र्यदिनी मंदिरासमोरच लावण्यात आला आहे. शिक्षणसंस्था व ग्रामस्थांच्या परस्परविरोधी दावे-प्रतिदाव्यांच्या प्रकाराने प्रत्यक्ष हनुमानास वेठीस धरण्याचा प्रकार श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी झाला आहे. दि. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेतही हे मंदिर शिक्षण संस्थेकडून काढून घेण्याचा ठराव दोन हजार लोकांच्या सह्यांच्या अर्जाद्वारे करण्यात आला आहे. तरीही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत असल्याने मंदिर बंद राहिले आहे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून होत असल्याने संपूर्ण परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.गोवे गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेची १९६१ मध्ये स्थापना करून श्री कोटेश्वर विद्यालय सुरू करण्यात आले. या विद्यालयासाठी जागा व इमारत नव्हती, त्यासाठी ग्रामस्थांनी मारुती मंदिरातील सभामंडप व इतर असणाऱ्या मोकळ्या खोल्या ज्ञानदानाच्या या चांगल्या कार्यास दिल्या. लोकसहभागातून थोडीफार दुरुस्ती करण्यात आली. त्याच ठिकाणी या विद्यालयाचे वर्ग सुरू झाले.या शाळेचे संस्थापक सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकासाठी संस्थाचालकांनी समिती स्थापन करून विद्यालयाची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. विद्यालयाच्या इमारतीसाठी आणि शिक्षण संस्थेसाठी दिवंगत गोपाळ बर्वे आणि मनुकाबाई जिजाबा जाधव यांनी स्वखुशीने जमीन दान केले. त्या जमिनीवर जिजाबा अण्णाच्या स्मारकाचे व विद्यालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम करून आज त्या ठिकाणी विद्यालय सुरू झाले आहे. मुख्याध्यापक कक्ष, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, कार्यालय, ग्रंथालय अशा सर्व १८ खोल्या उपलब्ध असूनही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक ग्रामस्थांच्या भावना दुखवल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तरीही आम्ही ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करतो, असे संस्थेकडून सांगण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत गोवे येथील ग्रामस्थांनी सांगितले की, सध्या मंदिरातील खोल्यांचा शाळेसाठी वापरच केला जात नाही. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांना मंदिराच्या एका बाजूने छोट्याशा बोळातून आत सोडले जाते. मंदिरातील सभामंडपात भजन, पूजन, प्रवचन कीर्तन, हनुमान जयंती उत्सवासारखे कोणतेही कार्यक्रम घेणे शक्य होत नाही. कारण या मंदिराच्या सभामंडपातच शालेय बेंच, डेस्क, कपाटे, टेबल फर्निचर व अडगळीचे साहित्य ठेवले आहे. हनुमानाचे मंदिर ग्रामस्थांच्या ताब्यात मिळावे म्हणून तसा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाकडेही केला आहे, असेही ग्रामस्थांनी सांगितले. (प्रतिनिधी) ग्रामस्थांकरवी मंदिराचा ताबा घेऊ...ग्रामस्थांच्या सामूहिक योगदानातून शैक्षणिक संस्थेच्या वापरासाठी मंदिराचा ताबा दिला होता. या मंदिराचा गैरवापर करण्याचे संस्था संचालकांकडून थांबवले जात नाही. ग्रामस्थांच्या ताब्यात मंदिर मिळावे म्हणून अनेकांना निवेदन दिले आहे. याबाबत कोणत्याही विभागाने कसलीही हालचाल, चौकशी केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने अथवा शाळेने जर मंदिर मोकळे करून दिले नाही तर आम्ही ते ग्रामस्थांकरवी मोकळे करू व हनुमानास मुक्त करू, असा इशाराही गोवे येथील तरुणांनी यावेळी दिला आहे.१५ आॅगस्टच्या ग्रामसभेमुळे अचानकपणे ग्रामस्थांनी मंदिराचा विषय घेऊन ठराव करण्याची गरज नव्हती. आम्हास त्याबाबत कसलीही माहिती नव्हती.-आनंदराव जाधव, अध्यक्ष कोटेश्वर विद्यालय, गोवे