शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएलओ’ कामातून मुक्ती

By admin | Updated: October 9, 2015 21:21 IST

न्यायालयाचे आदेश : शिक्षकांची सुटका

आनंद त्रिपाठी - वाटूळ -राज्यातील हजारो शिक्षकांची आता बीएलओ तसेच इतर अशैक्षणिक कामातून सुटका झाली असून, शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली व अशा प्रकारच्या कामाची सक्ती करण्यात येऊ नये असा अंतरीम आदेश न्यायालयाने दिला आहे.आमदार रामनाथ मोते यांच्यावतीने अ‍ॅड. नरेंद्र बांदिवडेकर यांनी काम पाहिले. सध्या शिक्षकांना सरलची कामे, पायाभूत परीक्षांचे आयोजन, सहामाही परीक्षांची तयारी तसेच इतर कामे असल्याने न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना, शिक्षकांना कोणत्याही कामाची सक्ती करु नये असे आदेश दिला. बीएलओच्या कामाबरोबरच इतर अशैक्षणिक कामांना स्थगिती दिली असून, आता या कामांनाही शिक्षकांना सक्ती करता येणार नाही. जर कोणाला स्वेच्छेने ही कामे करायची असतील त्यांना ही कामे द्यावीत असेही न्यायालयाने आपल्या अंतरीम आदेशात नमूद केले आहे. शिक्षकांना अध्यापनासोबतच सरलची माहिती भरणे, परीक्षांचे नियोजन, पेपर्स तपासणे, निकालपत्र तयार करणे आदी कामे आहेत. बीएलओच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत होते. यासाठी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षकांच्या या अशैक्षणिक कामांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.स्वागत : शिक्षक परिषद शिक्षकांचीचशिक्षक परिषद ही फक्त शिक्षकांचीच संघटना आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नुसते निवेदने व आंदोलने न करता न्यायालयीन मार्गाने शिक्षकांना न्याय देण्याचे कार्य आमदार रामनाथ मोते यांच्या माध्यमातून संघटनेने केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.- रमेश जाधवअध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा शिक्षक परिषदआमदार रामनाथ मोते यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा अंतरीम आदेशअशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका होणार.ज्या शिक्षकांना स्वेच्छेने काम करणाऱ्या शिक्षकांना ती कामे देण्यास हरकत नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबण्यास मदत.शिक्षकांना दिलासाशिक्षकांना देण्यात येणाऱ्या कामाविरोधात आमदार रामनाथ मोते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णयाने शिक्षकांना दिलासा दिला आहे.