शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जलस्त्रोतांसाठी पडीक विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Updated: July 8, 2016 01:06 IST

कातरखटाव : चौदाव्या वित्त आयोगातून गाळ काढून खोलीकरण

कातरखटाव : ‘जसे कर्म तसे फळ, या म्हणीप्रमाणे गावकारभाऱ्याने विकास करायची दूरदृष्टी चांगली ठेवली तर निधी कमी पडणार नाही. चौदाव्या वित्त आयोगातून कातरखटाव ग्रामपंचायतीने ‘जलस्रोताचा विकास करण्यासाठी तसेच बौद्ध व मातंग वस्तीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी ओढ्यावरील जुन्या विहिरीचा गाळ काढून खोलीकरण करण्यासाठी दोन लाखांचा उपलब्ध निधी वापरण्यात आला आहे.उन्हाळ्यात पाणी-पाणी करणाऱ्या गावच्या जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून पन्नास ते साठ वर्षांच्या जुन्या विहिरीचे खोलीकरण करण्यात आले आहे. गाळ व दगड काढून पस्तीस फूट खोल खोलीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खोलीकरण करताच पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. दुष्काळी व टंचाई परिस्थितीमध्ये विहिरीला पाणी पाहून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. जलस्रोताचा विकास होत असल्यामुळे गावातील दलित व मातंग वस्तीच्या लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. दलित बांधवांना अतिरिक्त पाणी शेतीसाठी वापरता येईल. हे काम यशस्वी होण्यासाठी सरपंच तानाजी बागल व उपसरपंच संतोष बागल यांनी परिश्रम घेतले. तसेच सदस्य मुबारक मुल्ला यांनी स्वमालकीचा ट्रॅक्टर माल वाहतुकीला देऊन सहकार्य केले. (वार्ताहर)नागरिकांची वणवण थांबणार..!येरळवाडी धरणातून करण्यात येणाऱ्या नियोजित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या साठ्याची विहीर उपलब्ध झाल्याने समाधान वाटते. शासनाचा आलेला निधी विकास कामासाठीच वापरला जाईल. कोणालाही एक रुपया खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही. जिथे निधी कमी पडेल तिथे पदरमोड करणार.- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव