शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

राज्य कोणाचेही असो सत्ता रामराजेंभोवतीच!

By admin | Updated: May 31, 2016 00:37 IST

तीस वर्षांचा इतिहास : विधान परिषदेवर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने उत्साह

नसीर शिकलगार--फलटण -अपेक्षेप्रमाणे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने तसेच लाल दिवा पुन्हा शाबूत राहिल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रामराजेंना सत्ता असो किंवा नसो लाल दिवा मिळत असल्याने शरद पवारांवरील निष्ठेचे फळ मिळत असल्याचे बोलले जात आहे.फलटण तालुका राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. या तालुक्याचे आतापर्यंत दिवंगत मालोजीराजे नाईक-निंबाळकर, दिवंगत हरिभाऊ निंबाळकर, दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, चिमणराव कदम, माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी नेतृत्व करताना आपल्या व्यक्तिमत्व व कार्याद्वारे वेगळा ठसा राज्याच्या व देशाच्या राजकारणात उमठविला आहे. त्यामुळे फलटणचे नाव राजकारणात आदराने घेतले जात आहे. तालुक्यातील मालोजीराजे नाईक-निंबाळकर, चिमणराव कदम, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, रामराजे नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व विद्यमान जि. प. अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना आतापर्यंत लाल दिवा मिळाला असला तरी सर्वाधिक काळ लाल दिव्यात राहण्याचा मान रामराजे नाईक-निंबाळकर यांनाच मिळाला आहे.लाल दिवा व रामराजे हे एक अतूट समीकरण झाले आहे. १९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर पहिल्यांदा विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळी राज्यात युती शासनाची सत्ता आली. रामराजे अपक्ष असतानाही त्यांना युती शासनाने कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून प्रथम लाल दिव्याची संधी दिली. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आली. मध्यंतरी मतदारसंघ आरक्षित झाल्याने रामराजेंचे काय होणार अशी शंका व्यक्त होत असताना शरद पवारांनी निष्ठावंत रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिलीच पण लाल दिवाही दिला. १९९५ पासून आजपर्यंत रामराजेंभोवती राज्यात कोणाचीही सत्ता असो लाल दिवा फिरतच आहे. आता पुन्हा विधान परिषदेवर शरद पवारांनी रामराजेंना संधी दिल्याने सहा वर्षे तरी आता लाल दिवा जात नसल्याचे चित्र आहे. निष्ठेचा राष्ट्रवादीकडून सन्मानसध्या राष्ट्रवादीचे दिग्गज असलेले खुद्द शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांना लाल दिवा नसतानाही शरद पवारांनी रामराजेंना लाल दिवा देऊन सातारा जिल्ह्याचा व निष्ठेचा सन्मान केल्याचे दिसून येत आहे.