शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

रिफाई्ंडमुळे वाढते चरबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:46 IST

स्टार : १०५६ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा ...

स्टार : १०५६

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढते, हृदयावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक घाणा तेलाला मागणी वाढत आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. चरबी वाढण्यासह हृदयरोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे शक्य तो घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

खाद्यतेल रिफाईंड करताना केमिकलचा वापर केला जातो. ही केमिकल्स आपल्या शरीरास सर्वाधिक हानी पोहोचवतात. या तेलाच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात ब्लॉकेज तयार होण्याचा धोका असतो. हृदयविकारासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. वात विकार असंतुलित राहतात असे तज्ज्ञ सांगतात. तेल रिफाईंड करताना प्रारंभी ३०० डिग्री सेल्सिअस आणि दुसऱ्यांदा ४६४ डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर उकळले जाते. डबल आणि ट्रिपल रिफाईंड करताना तेल उकळल्याने त्यात अनावश्यक घटक समाविष्ट होतात. ते अपायकारक ठरतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

याउलट शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेल्या हायडेन्सिटी लिपोप्रोटिन हा घटक लिव्हरमध्ये तयार होतो. आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध तेल खालल्याने वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब अशा गंभीर आजारांवरही शुद्ध तेल गुणकारी आहे.

चौकट :

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

देशात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार ही त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

घाण्याचे तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेल बियांवर जास्त दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो. एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत. रिफाईंड तेलाला पर्याय म्हणून घाण्याच्या तेलाचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

रिफाई्ंड तेल घातक का?

सध्या बहुतांश लोक रिफाईंड तेल वापरतात. अतिशय उच्च तापमानाला काही रसायन वापरून हे तेल काढले जाते. या प्रोसेसमध्ये तेलामध्ये नैसर्गिकरीत्या असलेली जवळपास सगळे चांगले गुणधर्म निघून जातात. त्यामुळे शरीरासाठी आणि त्यातही हृदयासाठी अतिशय घातक असे ठरतात. नैसर्गिक रंग, वास आणि चव काढून त्याला न्यूट्रल बनवण्यासाठी त्यामध्ये काही रसायन मिसळली जातात. त्यामुळे तेलाची गुणवत्ता खालावते.

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

रिफाई्ंड तेलापेक्षा घाण्यावरील नैसर्गिक तेल आरोग्यासाठी कायमच लाभदायक आहे. घाण्याचा तेलामुळे तेलातील नैसर्गिक तत्त्व आपल्या शरीराला भेटतात. त्यामुळे शरीरावर काही परिणाम होत नाही. रिफाई्ंड तेलामुळे विपरीत परिणाम होत असतात.

- अनघा तेंडोलकर, आहारतज्ज्ञ