शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लाल मातीच्या पळवापळवीने गावे रंगली !

By admin | Updated: March 7, 2017 17:20 IST

वाहतूक जोरात : गावागावांत उडतोय धुरळा; वाहनधारकांसह ग्रामस्थांनाही त्रास

लाल मातीच्या पळवापळवीने गावे रंगली !वाहतूक जोरात : गावागावांत उडतोय धुरळा; वाहनधारकांसह ग्रामस्थांनाही त्रासमल्हारपेठ : कोयना काठावरून लाल मातीचे उत्खनन करणारे सध्या मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. तर ही वाहतूक उघड्या ट्रॉलीतून होत असल्यामुळे गावातील रस्ते रंगल्याची परिस्थिती दिसत आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितांनी वाहतूकदारावर निर्बंध घालून बंदिस्त माती वाहतूक करण्यासाठी सक्ती करण्याची मागणी होत आहे. कोयना नदीकाठच्या अनेक गावांतून वीटभट्टीसाठी बेसुमार माती उत्खनन अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामुळे नदीपात्र मोठे झाले आहे. पावसाळ्यात पुराचा धोका असून, अनेक गावांत पाणी शिरत असून, शेतीचा ऱ्हास होऊ लागला आहे. महसूल विभाग याकडे कानाडोळा करत आहे. ठराविक ट्रॉलींची परवानगी काढली जात असून, अनेकजण बेसुमार माती वाहतूक करत आहेत. याबाबत कोणताही नियम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभागाकडे नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक ट्रॉली न झाकता लाल मातीची वाहतूक करतात. त्यामुळे लाल मातीचा मोठ्या प्रमाणावर धुरळा उडतो. धुळीचे प्रमाण वाढल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाल मातीच्या वाहतुकीमुळे अनेक घरे, रस्ते, अंगण लाल झाले आहे. उघड्यावर वाहतूक होत असल्याने धुरळा उडत असून, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यास खतपाणी घालणारा महसूल विभाग डोळेझाक करून याकडे पाहत आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत अनेक वीट व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर लाल मातीची लूट सुरू आहे. शेतकरी आपल्या क्षेत्रासमोर नदीकाठापर्यंत असणारे क्षेत्र दाखवत असल्याने नदीकाठचा मोठा ऱ्हास झाला आहे. व्यावसायिकांनी ट्रॅक्टर मालकांना फेऱ्यावर पैसे ठरविल्यामुळे जास्तीत जास्त फेरे व्हावे म्हणून अति वेगाने गावातील कच्च्या रस्त्यातून ट्रॅक्टर पळवत आहेत. याचा परिणाम गावातील संपूर्ण रस्ते लाल झाले असून, धुरळा उडाल्यामुळे गावेही लाल झाली आहेत. माती घेणारे व्यावसायिक धनदांडगे असून, महसूल विभाग व गाव नेत्यांना चिरीमिरी देऊन लाल मातीची लूट सुरू आहे. याबाबत तलाठी किंवा अधिकाऱ्यांना विचारले असता राजकीय मंडळींचे फोन येतात, अशी उत्तरे ऐकण्यास मिळत आहे. पाटण तालुक्यातून लाल माती घेऊन कऱ्हाडकडे जाणारे अनेक ट्रॅक्टर अति वेगात असतात. गतवर्षी म्होप्रे गावच्या हद्दीत अपघातही झाला होता. तसेच विजयनगर-कऱ्हाड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने टॅ्रक्टरवाले माती झाकून नेतात. मात्र, व्यवस्थीत न झाकल्याने मातीचा त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उघड्यावर मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)सुटीदिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूकलाल मातीची पळवापळव सरकारी सुटीदिवशी मोठ्या प्रमाणात होते. अनेकवेळा बेकायदेशीर गौण खनिज व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होऊनही दखल घेतली जात नाही. शासनाचे गौण खनिज उत्खननाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित पळवाटा काढत आहेत.अधिकारी तेच; फक्त टेबल बदलतेमहसूल विभागातील अधिकारी अनेक वर्षांपासून विभागात कार्यरत आहेत त्यांच्या तोंडाला लाल माती लागल्यामुळे फक्त टेबलाची आदलाबदल होत आहे. मात्र, यांची बदली होत नाही. जुने कर्मचारी नवीन सहकाऱ्याच्या मदतीने संगनमत करून गौण खनिज, वाळू, माती उद्योगाचे जाळे वाढवत असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.