शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:19 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व इतर महत्त्वाची कागदपत्रे गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या ‘झिरो पेंडन्सी’च्या आदेशामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यावरील धूळ झटकली गेली. तसेच कार्यालयांत इतरस्थ: पसरलेल्या कागदांना शिस्त लागली. ९ जूनला आयुक्तांनी आदेश काढले अन् जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सीच्या कामाची एकच लगबग सुरू झाली. रात्री-अपरात्री जागून ही कामे सुरू करण्यात येत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, प्रांत अशा कार्यालयांमध्ये कर्मचाºयांचे एक टार्गेट झिरो पेंडन्सी पाहायला मिळत होते. दरवर्षीच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात सर्व शासकीय कार्यालये झिरो पेंडन्सीची कामे केली जातात. त्यामुळे वर्षाअखेरीस कार्यालयांमध्ये लगबग दिसते. मात्र, आयुक्तांच्या आदेशामुळे जून महिन्यातच शासकीय कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरणाचे काम वेगाने सुरू झाले होते. येथील टीसीपीसीकडे शासकीय कार्यालयांमार्फत अभिलेख बांधणीसाठी लागणाºया गठ्ठ्यांची आॅर्डर दिली जाते. टीसीपीसीमधून हे रुमाल व इतर साहित्य बनवून दिले जाते. आॅर्डरप्रमाणे कर्मचारी रुमाल बनवून देतात. १ जून ते २० आॅगस्ट या अडीच महिन्यांच्या काळात तब्बल ३ हजार ८१ रुमालांची आॅर्डर मिळाली. त्यापैकी १ हजार ५८१ रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्यात आली तर उर्वरित १ हजार ५०० रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टीसीपीसीतून मिळाली. १९५९ पासून टीसीपीसीतर्फे हे काम केले जाते. १९६५ पर्यंत कागदपत्रे कपाटांवर रचली जात होती. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांनी अभिलेख वर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ही कागदपत्रे रुमालांत बांधली जाऊ लागली.कागदपत्रे वेगळी, रुमाल वेगळाकायमस्वरूपी जतन करून ठेवायचे अभिलेखे लाल रुमालात, ३0 वर्षांपूर्वीची कागदपत्रे हिरव्या रुमालात, दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे पिवळ्या रुमालात तर एक वर्षानंतर नष्ट करावयाची कागदपत्रे पांढºया रुमालात बांधून ठेवली जातात. रुमालांच्या रंगावरुन त्यातील कागदपत्रे किती जुनी आहेत, त्याचा अंदाज बांधता येतो.