शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील मंडल कार्यालयांची पुनर्रचना

By admin | Updated: July 4, 2017 13:55 IST

नवीन समाविष्ट गावांच्या सजांचे प्रारुप आरखडे तयार करणार, नागरिकांच्या हरकती व सूचना आमंत्रित

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0४ : राज्यातील तलाठी सजा आणि मंडल कार्यालयांची पुर्नरचना केली जाणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन समाविष्ट गावांच्या सजांचे प्रारुप आरखडे तयार केले जाणार आहेत. त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घ्याव्यात. ३१ आॅक्टोबरपर्यंत नवीन तलाठी, मंडल कार्यालयांची अधिसूचना जाहीर करावी, असे आदेश महसूल विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली. या संदर्भात राज्य शासनाने दि. २५ मे रोजी निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सहा महसूल विभागांमध्ये एकूण ३ हजार १६५ नवीन तलाठे सजे आणि ५२८ मंडल निर्माण होणार आहेत. त्या संदभार्तील वेळापत्रक राज्यस्तरीय महसूल परिषदेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या सर्व विभागीय आयुक्तांकडून नवीन तलाठी सजांची जिल्हानिहाय संख्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिली जात आहे. पुणे विभागासाठी ४६३ तलाठी सजे आणि ७७ मंडल कार्यालये नव्याने स्थापन होणार आहेत. यात सातारा जिल्ह्यातही नवीन सजे आणि मंडल कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत सर्व प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदारांची समिती स्थापन करुन तालुकानिहाय माहिती संकलित करण्यात येणार होती. या माहितीचा अहवाल संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. दि. ३१ आॅगस्ट रोजी या अहवालास मान्यता देऊन नवीन तलाठी सजे आणि मंडलांची प्रारुप अधिसूचना जाहीर करुन त्यावर हरकती व सूचना मागविणे अपेक्षित आहे. ३१ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम अधिसूचना प्रसिध्द होणार आहे.सहा तलाठी सजामागे एक मंडल कार्यालय असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत स्थापनेचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर १५ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येतील. त्यानंतर पुढीलवर्षी १५ फेब्रुवारीला मंडल कार्यालयांची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.