शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी मातेला मुलाच्या यशाची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 15:00 IST

तरडगाव : पती निधनाच्या पश्चात शेतात राबून मुलाच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाºया मातेच्या पाठीशी आता अख्खा गाव उभा राहिला आहे. फलटणच्या आमदारांनी मुलाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली तर तरडगावकरांनी रोहिणी अडसूळ या मातेला मुलाच्या शिक्षणासाठी तब्बल २५ हजार रूपयांची मदत केली आहे.

ठळक मुद्देमुलगा रोहनच्या शिक्षणासाठी घेतले कष्ट दिवसभर दुसºयाच्या रानात मोलमजुरीदोन्ही मुलांना शिक्षणासाठी सायकलवरून सोडून पुन्हा घरी आणतमातेला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने तरडगाव ग्रामस्थ एकत्र

तरडगाव : पती निधनाच्या पश्चात शेतात राबून मुलाच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाºया मातेच्या पाठीशी आता अख्खा गाव उभा राहिला आहे. फलटणच्या आमदारांनी मुलाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली तर तरडगावकरांनी रोहिणी अडसूळ या मातेला मुलाच्या शिक्षणासाठी तब्बल २५ हजार रूपयांची मदत केली आहे. 

घरातील कर्त्या पुरुषावर कुटुंबाची जबाबदारी असतानाच ते अर्ध्यावरच संसाराचा डाव सोडून गेल्यावर तरडगाव, ता. फलटण येथील अडसूळ  कुटुंबाची वाताहत झाली. तरीही रोहिणी अडसूळ यांनी मुलगा रोहन याच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. त्याची आता जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याने रोहिणी यांना त्यांच्या कष्टाचे चिज झाल्याचे वाटत आहे. त्यांची मुलगी प्रितीही नियमीत शाळेत जात आहे.

घरापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर व तसं पाहिलं तर धोकादायक लोणंद-फलटण रस्त्याच्याकडेला असणाºया चाळशी मळा येथील शाळेत त्या आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी सायकलवरून सोडून पुन्हा घरी आणत असत. दरम्यान, दिवसभर दुसºयाच्या रानात मोलमजुरी करुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. यातूनच त्या प्राथमिक गरजा व मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कमवू लागल्या. आता मुलाच्या यशानंतर या मातेला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने तरडगाव ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी मदत केली आहे.

रोहनच्या आईने मुलांसाठी घेतलेले कष्ट इतर सर्वसामान्य कुटुंबातील  महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. खडतर परिस्थितीत रोहन याने मिळविलेले यश अलौकिक असून बारावीनंतर त्याच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी आम्ही काही लोक स्वीकारणार आहे.- दीपक चव्हाण, आमदार