शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेवंडे खूनप्रकरणी गावकरी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:42 IST

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल ...

सातारा : छेडछाड केल्याचा जाब विचारायला गेलेल्या चुलत्याचा खून झाल्यानंतर काही गावकºयांनी बैठक घेऊन पंच कमिटीमध्ये हे प्रकरण परस्पर मिटविल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेऊन ही घटना माहिती असलेल्या अधिकाºयाची कानउघडणी करून तत्काळ खुलासा करण्याबरोबरच संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.‘खूनप्रकरणी गावात समांतर न्यायालय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परळी खोºयातील रेवंडे परिसरात घडलेल्या या अजब घटनेने समाजमन ढवळून निघाले. दरम्यान, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे ‘लोकमत’ने पंच कमिटीच्या निर्णयाची प्रत सादर केली. त्यावेळी तेही हा अजब न्यायनिवाडा पाहून चकीत झाले. तक्रारदार नसेल तरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये ‘सुमोटो’ने तक्रार देणे गरजेचे होते, असे मत व्यक्त करतच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांना धारेवर धरले. ‘तुम्हाला हे प्रकरण माहिती असताना तुम्ही तक्रारीची वाट कशी काय पाहू शकता, ‘सुमोटो’ने गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असे त्यांना सुनावले.दरम्यान, या प्रकरणामध्ये दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे त्यावेळचे ठाणे अंमलदाराकडून खुलासा मागविण्याचे आदेशही अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत.वास्तविक, माने नामक व्यक्तीचा मृत्यू होऊन तब्बल दहा दिवस झाले होते. त्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीदिवशीच एका अधिकाºयाला एका जागृत नागरिकाने या भीषण घटनेची कल्पना दिली होती. त्यानंतर चवरे यांनी आपले काही सहकारी रेवंडे परिसरात पाठवून पीडित मुलीचा जबाब घेऊन केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. परंतु मूळ घटनेला पोलिसांनी बगल दिल्याचा आरोप काही नागरिकांकडून झाल्यानंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाची सत्यता तपासली असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या माने नामक व्यक्तीचा मृतदेह दरडीमध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्या भावाने माझ्या भावाचा घातपात झाल्याचा आरोप केला. त्यामुळे पंच कमिटीने ताडीची बैठक घेऊन झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून वाच्यता न करण्याचे फर्मान सोडले. एवढेच नव्हे तर एका कागदावर अकरा जणांच्या सह्या घेऊन संबंधित खुनाचा गुन्हा कबुल करून ‘ग्रामस्थ जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य आहे,’ असे लिहूनही दिले. असे असतानाही म्हणे पोलिसांना तक्रार हवी होती. गावच्या समांतर न्यायालयामध्ये हा न्यायनिवाडा झाला असताना पोलिसांना तक्रारदार कसा मिळेल? असाही प्रश्न उपस्थित होतो.अनेकांची चौकशी सुरू..पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. बुधवारी दुपारी रेवंडे परिसरात जाऊन या प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.