शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

थिएटरच्या संरक्षणासाठी बाउन्सर ‘राजलक्ष्मी’ चालकांचा निर्धार : न भीता चित्रपटागृह सुरूच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:12 IST

सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या एकमेव राजलक्ष्मी थिएटर परिसरात सोमवारी काही युवकांनी धिंगाणा घातला. मात्र, थिएटर चालकांनी या गावगुंडांना न घाबरता थिएटर चालूच ठेवण्याचा निर्धार केला

स्वप्नील शिंदे ।सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या एकमेव राजलक्ष्मी थिएटर परिसरात सोमवारी काही युवकांनी धिंगाणा घातला. मात्र, थिएटर चालकांनी या गावगुंडांना न घाबरता थिएटर चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तसेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाउन्सर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

हुल्लडबाजी आणि फुकट चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर राडा करणाऱ्यांमुळे सातारा शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेले राधिका टॉकीज काही वर्षांपूर्वी तर दोन दिवसांपूर्वी समर्थ थिएटर चालकांनी चित्रपटगृह बंद केले. सोमवारी दुपारी राजलक्ष्मी चित्रपटागृहामध्ये आत जाण्यासाठी प्रेक्षकांची गेटजवळ गर्दी झाली होती. कर्मचारी तिकिटे पाहून प्रेक्षकांना आत सोडत असताना काही तरुण तिकीट न दाखवताच आत गेले. त्यांना तिकिटाची विचारणा केली असता कर्मचाºयांशी हुज्जत घालत मारहाण केली. तसेच काचेची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.समर्थ टॉकीज पडद्याआडशाहूकला मंदिराच्या जन्माआधी साताºयात आंनदीबाई घाटे हे एकमेव बंदिस्त थिएटर होते. त्यानंतर त्याचे ‘आनंद’ टॉकीज झाले. कालांतराने त्यानेच ‘समर्थ’ नाव धारण झाले. तेच दोन दिवसांपूर्वी पडद्याआड गेले आहे. 

उरले फक्त राजलक्ष्मीसातारकरांच्या अनेक पिढ्यांना चंदेरी दुनियाची सफर घडवणारे आधी चित्रा बंद झाले. त्यानंतर प्रभात मावळला, जयविजयचा दुवा तुटला, कृष्णा आणि राधिका गेले. त्यानंतर आता समर्थ बंद पडल्याने एकमेव राजलक्ष्मी थिएटर लोकांचे मनोरंजन करत आहे. 

आम्हाला सातारकरांची सांस्कृतिक चळवळ टिकवायची आहे. त्याचबरोबर व्यवसाय चालवायचा असल्याने अनेक आव्हाने येत असतात. त्याला तोंड देण्यासाठी चार बाउन्सर चित्रपटगृहाबाहेर उभे करणार आहे.-शशी कोर्टिया, व्यवस्थापक, राजलक्ष्मी टॉकीज