शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

‘रयत’चा लिलाव होऊ देणार नाही !

By admin | Updated: September 23, 2016 00:45 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : संघर्ष माझ्या पाचवीलाच; डगमगत नसल्याचे सांगत बंडखोरांना फटकारले

उंडाळे : ‘रयत कारखाना म्हणजे या भागातील रयतेचा संसार आहे. संघर्ष माझ्या पाचवीलाच पूजला आहे. यापुढेही कितीही संघर्ष झाला तरी रयत कारखान्याचा मी कधीही लिलाव होऊ देणार नाही,’ असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले. राजकारणातला सुरुवातीपासून सुरू असणारा संघर्ष आजही सुरू असला तरी मी डगमगत नसल्याचे सांगत त्यांनी बंडखोरांना फटकारले.शेवाळवाडी-म्हासोली, ता. कऱ्हाड येथे रयत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विलासराव पाटील-उंडाळकर बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय पाटील, उपाध्यक्ष आप्पासाहेब गरूड यांच्यासह संचालक, सभासद, अथणी शुगरचे संस्थापक पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘डोंगरी भागातील लोकांचे जीवनमान सुधारावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी रयत कारखान्याची उभारणी शेवाळवाडीच्या माळावर केली आहे. हा कारखाना उभा करण्यासाठी माझ्यासह या भागातील अनेक लोकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. काहीनीं तर आपल्या माता-भगिनींचे दागिने गहाण ठेवून भागभांडवल दिले आहे. हे मी कधी विसरू शकणार नाही. राजकारणामध्ये मी खूप संघर्ष पाहिला आहे. मात्र, मी कधीही डगमगलो नाही. स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांनी आपली जमीन विकून समाजाची सेवा केली. त्याचप्रमाणे गेल्या चाळीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मीही लोकांची सेवा करीत आलो आहे. सत्तेसाठी कधीही कुणासमोर लाचार झालो नाही आणि यापुढच्या काळातही होणार नाही. माझ्या चारित्र्यावर कुठलाही डाग पडू दिलेला नाही.रयत कारखान्याच्या उभारणीत परिसरातील जनतेने मोलाचे योगदान दिले आहे. हे कधीही विसरू शकणार नाही. रयत कारखान्यावर ८१ कोटींचे कर्ज असून, अशा परिस्थितीतही अथणी शुगरने गतवर्षीपासून हा कारखाना चालवायला घेतला आहे. तो फक्त आपल्यावर असलेल्या विश्वासामुळेच त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही एक पैसा कारखाना बुडू देणार नाही.’अ‍ॅड. उदय पाटील म्हणाले, ‘अथणी शुगरसोबत रयत कारखान्याचा १९ वर्षांचा करार झाला आहे. या कारखान्यावर असलेले कर्ज फेडून भविष्यात सुमारे अडीचशे कोटींचा असणारा हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईल. निसर्ग आणि मानवनिर्मित्त अनेक अडचणींमुळे कारखाना चालविताना अडचणी येत आहे. मात्र, आता संचालक मंडळ सक्षम झाले आहे. कोणत्याही अडचणी आल्या तर त्या मोडून काढू, असे सांगत १२ हजार सभासदांपैकी फक्त साडेतीन हजार सभासदच कारखान्याकडे ऊस घालतात. इतर सभासदांनीही ऊस पिकाकडे लक्ष दिल्यास कारखान्याला बाहेरून ऊस आणावा लागणार नाही.’सभेला सभासदांची मोठी उपस्थिती होती. (वार्ताहर)जयसिंगराव पाटील अनुपस्थितउंडाळकर कुटुंबामध्ये कुटुंबातील संघर्ष गत आठवड्यात सर्वश्रूत झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत विलासराव पाटील-उंडाळकर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यावरूनच माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील उपस्थित राहणार का? याचीही उत्सुकता होती. मात्र, जयसिंगराव पाटील अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.