शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रयत’ने तंत्रकुशल पिढी भारताला दिली

By admin | Updated: September 28, 2015 23:45 IST

सी. विद्यासागर राव : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरवोद्गार

सातारा : रयत शिक्षण शिक्षण संस्थेचा देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेने ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच तंत्रकुशल पिढी देशाला दिली आहे, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंंबाळकर अध्यक्षस्थानी होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी चेअरमन डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.सी. विद्यासागर राव म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये संतांनी भक्तीची चळवळ निर्माण केली तर महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेटाने पुढे नेली. कर्मवीरांच्या चळवळीला लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर मिळाला, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरले. त्यांच्यासारखा ध्येयवादी माणूस होणे नाही. १९२१ साली केवळ २१ टक्के लोक साक्षर होते, त्याच ठिकाणी २0१५ मध्ये ८३ टक्के लोक साक्षर आहेत. १९२१ साली केवळ २ टक्के महिला साक्षर होत्या, तेच प्रमाण वाढून आजच्या घडीला ७0 टक्के इतके झाले आहे. हे आकारास येण्यासाठी रयत चे योगदान मोठे आहे. दरम्यान, आपल्या मनोगताच्या सुरुवातीलाच राज्यपालांनी ‘मी मराठी शिकत आहे, मला चांगलं मराठी येत नाही,’ असं म्हणून प्रेक्षकांपुढे इंग्रजीत बोलण्याची अनुमती मागितली. कर्मवीरांच्या शिक्षणाचे महत्त्व विशद करताना त्यांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस,’ असं मराठीतील संतांचे वचन मांडले. (प्रतिनिधी)सर्व्हे धक्कादायक.. --महाराष्ट्रातील ५0 अभियांत्रिकी महाविद्यालयांचा नुकताच सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये बहुसंख्ये २१ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे गणित व प्रश्न सोडविण्याची क्षमता १५ वर्षांच्या मुलांपेक्षाही कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे राज्यपालांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.