शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

‘रयत’चा ‘कुमुदा’शी संबंध नाही : पाटील

By admin | Updated: November 18, 2014 23:36 IST

नो कॉमेन्टस्--शेतकरी आता कुमुदालाच ऊस घालतो

कऱ्हाड : रयत सहकारी साखर कारखाना हा शासनाच्या परवानगीने व मान्यतेने कुमुदा शुगर अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोडक्टस् लि. यांना १९ सप्टेंबर २०१३ रोजी चालविण्यास देण्यात आला आहे. जवळपास अठरा वर्षांचा हा करार आहे. त्यामुळे रयत कारखान्याने एफआरपीनुसार दर दिला नसल्याची माहिती पूर्णत: चुकीची असून ‘रयत’चा ‘कुमुदा’शी कसलाही संबंध नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंगराव पाटील व अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. थोरात म्हणाले, यापूर्वी तीन वर्षे कोल्हापूरच्या शाहू कारखान्याशी रयतने करार केला होता. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने १९६० चे कलम २० अ या सहकार कायद्यानुसार २०१३-१४ या गळीत हंगामापासून ‘कुमुदा’ला २०१३ पासून त्यांच्याबरोबर साखर आयुक्त यांच्यासमोर झालेल्या करारान्वये १८ वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. त्यामुळे या करारानुसार कराराच्या कालावधीत उसाच्या पेमेंटसहित सर्व दैनंदिन कामकाजाची व व्यवहाराची पूर्णपणे जबाबदारी ही कुमुदा शुगरची आहे. या व्यवहाराबाबत रयत साखर कारखाना कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. रयत कारखाना कुमुदा शुगर हे चालवित असल्याने कामकाजाबाबतच्या प्रसिद्ध होणाऱ्या माहितीमध्ये रयतच्या नावाने चर्चा करणे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)नो कॉमेन्टस्‘तुम्हाला रयत सहकारी साखर कारखाना चालवायला जमले नाही. म्हणून तुम्ही कुमुदा शुगर या प्रायव्हेट कंपनीला कारखाना चालवायला दिला आहे का,’ असे पत्रकारांनी छेडले असता अशोकराव थोरात यांनी याला ‘नो कॉमेन्टस्’ एवढेच उत्तर दिले. शेतकरी आता कुमुदालाच ऊस घालतो‘तुम्ही जरी कारखाना चालवायला दिला असला तरी शेतकरी अजूनही रयत या नावावर विश्वास ठेवून ऊस घालतो. त्यामुळे तुमची नैतिक जबाबदारी आहेच ना,’ असे विचारले असता शेतकरी आता कुमुदाला ऊस घालतो, रयतला नव्हे, असे अशोकराव थोरात यांनी सांगितले.