शेखर जाधव - वडूज -खटाव तालुक्यात डेंग्यूबाबत प्रशासनाने गंभीरपणे हालचाली सुरू केल्या असून नुकतीच तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या दालनात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. वडूज, मायणी येथील पंक्चर दुकानातील टायरमधील साडलेले पाणी ओतून देण्यात आले.या बैठकीस गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी युनुस शेख, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आठवड्यातील ‘बुधवार कोरडा दिवस’ पाळण्यात येणार असून घरातील पाण्याची सर्व भांडी कोरडी करून ठेवावीत, असे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले. गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यात प्रत्येक गावातील गटारे वाहती करण्यासाठी संबंधितांनी सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यासाठी तयारी केल्याची माहिती गटविकास अधिकारी देसाई यांनी दिली. डेंग्यूबाबत सतर्क राहून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहनही तहसीलदार साळुंखे यांनी केले. टायरमधील पाणी दिले ओतूनवडूज, मायणी येथील पंक्चर काढणाऱ्या दुकानांतील पाण्याने भरलेले टायर ओतून संबंधितांना सूचना देण्यात आल्या. तर तालुक्यातील प्रत्येक गावात या आजारासंदर्भात पूर्ण माहिती देऊन घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती मोहीम सुरू करणार असल्याचेही सांगण्यात आले. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दिसला टायर की पळतात रावसाहेब!
By admin | Updated: November 5, 2014 23:42 IST