शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रामघळ कुबडीतिर्थची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:24 IST

चाफळ : पर्यटन तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण विभागातील कुबडीतीर्थ रामघळीकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाविकांना चिखलातून मार्ग काढीत देवदर्शनाला जावे लागत असून खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांसह भाविकांनी या तिर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आहे.

ठळक मुद्देखड्डे पडल्याने तिर्थक्षेत्राकडे भाविकांची पाठ सोळा किलोमिटर अंतरात चिखलाचे साम्राज्यरामघळ कुबडीतिर्थला तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा

चाफळ :  पर्यटन तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण विभागातील कुबडीतीर्थ रामघळीकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाविकांना चिखलातून मार्ग काढीत देवदर्शनाला जावे लागत असून खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांसह भाविकांनी या तिर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आहे.

चाफळच्या पश्चिमेस उंच डोंगर कपारीत सुमारे १६ किलोमिटर अंतरावर रामघळ - कुबडीतीर्थ हे पर्यटनस्थळ आहे. ही घळ समर्थ रामदासांनी बनवली असल्याने तिला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या अनमोल ठेव्यास तालुक्याच्या लोकप्रतिनिधिंनी व येथील रामघळ कुबडीतीर्थ ट्रस्टने पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. परिणामी, गत दहा वर्षापुर्वी या ठिकाणास प्रशासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा दिला आहे.

पर्यटन खात्याने क वर्ग दर्जा दिल्यानंतर येथील रस्त्यासह उर्वरीत विकास कामांसाठी भरघोस निधी देवु केला होता. या निधितुन रामघळ परीसराच्या विकासाबरोबर रस्त्याचे काम करण्यात आले होते. २०१४ साली महाबळवाडी ते सडादाढोली दरम्यान ९०० मिटर अंतर रस्त्यावर खडिकरण व डांबरीकरणाचे काम केले. या कामास १९ लाख १९ हजार रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला होता.

वास्तविक बिबिएम, कारपेट करणे, सिलकोट करुन नाले काढण्यासाठी हा निधी मंजुर करण्यात आला. मात्र, रस्त्याकडेला कुठे नालेच दिसत नाहीत. नाले नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येवुन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

रामघळीपासुन महाबळवाडीपर्यंतच्या रस्त्याचे अंतर साडेतीन किलोमिटर आहे. यातील फक्त ९०० मिटर रस्त्याचे काम डांबरीकरण करण्यात आले आहे. याही रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने पर्यटक परत वळुन थेट उलटा धबधबा पाहण्यास सडावाघापुरला निघुन जात आहेत. त्यामुळे रामघळ व तेथील अल्हादायक परिसर पर्यटकांपासुन वंचित राहत आहे.