सातारा : साताऱ्याचा पश्चिम भाग जैवविविधतेने नटला आहे. या भागात विविध वन्यजीव आढळतात. वन्यजीव क्षेत्रात काम करीत असलेल्या काही युवकांना अतिदुर्मिळ असा ‘कांडेचोर’ नावाचा प्राणी आढळून आला आहे. इंग्रजीत याला ब्राऊन किवेट, असेही म्हटले जाते. साताऱ्यात हा प्राणी पहिल्यांदाच आढळून आला असून याची वनविभागाच्या दफ्तरी नोंद झाली आहे.पवण कुमार दुबे, दत्ता जगताप, शादाब शेख, रोहित शिंदे व रोहित लोहार यांना वन्यजीव निरीक्षण करीत असताना सातारा परिसरात रात्रीच्या वेळी कांडेचोर हा प्राणी आढळून आला. हा प्राणी अत्यंत लाजाळू असल्याने त्याचे छायाचित्र मिळवणेही अवघड असते. कांडेचोर हा एक सस्तन प्राणी आहे. कांडेचोर हा प्राणी शाकाहारी आणि निशाचर आहे. याचा रंग काळसर असतो. याच्या अंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या अंगाएवढीच त्याची शेपटीही लांब असते.हा प्राणी केरळ, कर्नाटक, गोवा तसेच पश्चिम घाटातील अंबोली, चांदोली याठिकाणी आढळतो. कांडेचोर दिवसा झाडांच्या फांद्यांवर किंवा ढोलीत झोपतो. हा प्राणी मुख्यत: गोड पदार्थ, फळे, किडे आदी खातो. (प्रतिनिधी)शास्त्रीय वर्गीकरण वंश : पृष्ठवंशीजात : सस्तनकुळ : मार्जारजातकुळी : पॅराडॉक्ज्युरसशास्त्रीय नाव : पॅराडॉक्ज्युरस जेरडॉनी १८८५जातीकाळा कांडेचोरतपकिरी कांडेचोर
साताऱ्यात आढळला दुर्मिळ कांडेचोर
By admin | Updated: December 2, 2015 00:39 IST