शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

टिंगल करणाऱ्यांना रणजितसिंहांचे कृतीतून उत्तर

By admin | Updated: October 18, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : नाव न घेता रामराजेंवर टीका; लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामाचा शुभारंभ

फलटण : ‘डोंगरात कोठे साखर कारखाना असतो का? अशी टिंगलटवाळी करणाऱ्यांना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामराजे यांचे नाव न घेता लगावला. तसेच ‘एफआरपी कायद्याची पुनर्रचना प्राधान्याने करणे गरजेचे आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपळवे, ता. फलटण येथे उभारलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या प्रथम गळित हंगामाच्या शुभारंभ व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर होते. विक्रमी जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. भारत भालके, आयडीबीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एस. के. वी. श्रीनिवास, स्रेहल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंंद्रसिंग, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर जी. के. पिल्ले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजय शिंदे, वसंतराव काळे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाषराव बेडके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, नाईक-निंबाळकर कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, रणजितसिंहांनी उपळवेसारख्या दुष्काळी भागात डोंगरावर मोठ्या जिद्दीने रेकॉर्डब्रेक विक्रमी वेळेत साखर कारखाना उभारला आहे. स्वराज दूध प्रकल्पाची ज्या पद्धतीने उभारणी करून त्याचे नाव देशात उंचावले, तसेच नाव साखर कारखान्याचे देशात उंचावून हा कारखाना रणजितसिंह देशात एक नंबरचा करतील,’. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेचे दर उतरल्याने कारखानदार एफआरपी पण देऊ शकत नाहीत. मात्र एफआरपीचा कायदा असल्याने यातून कारखानदार अडचणीत येऊ नये व ऊसउत्पादकांनाही न्याय मिळावा, ही भावना मनात ठेवूनच एफआरपी कायद्याची पुनर्रचना व्हावी, अशी अपेक्षा आहे. साखर उद्योगाला वारंवार कर्ज देऊन कारखानदारांवर कर्जाचा बोजा टाकण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्जाऐवजी अनुदान देऊन कारखान्यांना मदत करावी. शुगर डेव्हलपमेंट फंडात सुधारणा करून हा फंड बँकेत रूपांतर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. यावर सरकार काय करणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीने जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सरकारने उपाययोजना करावी. लोकप्रियतेपायी दुष्काळग्रस्तांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रणजितसिंहांनी उभारलेला कारखाना फलटणचा भाग्यविधाता ठरणारा व यातून तालुक्यात परिवर्तनाची नांदी होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. रणजितसिंहांनी दीड वर्षापूर्वी आम्हाला भूमिपूजनला बोलावले होते, व आज उद्घाटनाला बोलावून प्रत्यक्ष साखर कारखाना सुरू केला. हे आठवे आश्चर्य असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना वरदान ठरणारा हा कारखाना होणार आहे. असे स्पष्ट करतानाच नवीन तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ वापरामुळे या कारखान्याला उज्ज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही. अशा तालुक्यातील सत्ताधारी राजेगटांनी रणजितसिंहांची कारखाना उभारताना टिंगलटवाळी केली. त्यांना प्रत्यक्ष कारखाना उभारून रणजिसिंहांनी जोरदार लगावली आहे. ज्यांनी तालुक्यातील साखर कारखानदारी, दूध संघ, बँका मोडून खाल्या त्यांनी साखर कारखानदारीवर बोलू नये. माण-खटावला पृथ्वीच्या अस्तापर्यंत पाणी येणार नाही, असे सांगणाऱ्यांनी माण तालुक्यात येऊन पाणी बघावे. वाढत असलेला ऊस बघावा, अशी जोरदार टीका आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता केली. माझ्या वडिलांनी तालुक्याच्या विकासासाठी सतत संघर्ष केलाय. त्यांचा संघर्ष बघूनच येथील जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा आपण चंग बांधला आहे. मी दिवसरात्र तालुक्याच्या जनतेच्या चेहऱ्यावर सुख बघण्यासाठी झटले असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना उच्चांकी दर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. जनतेच्या हितासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवून त्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे रणजितसिंहांनी यावेळी स्पष्ट केले. उपळवे येथील या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.