शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

Lok Sabha Election 2019 प्रचारात रंगतंय ‘मानापमान’ नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:06 IST

कºहाड : सातारा लोकसभा मतदार संघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. कोणी कॉलर उडवतंय, डायलॉग ...

कºहाड : सातारा लोकसभा मतदार संघातील प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. कोणी कॉलर उडवतंय, डायलॉग मारतंय तर कोणी मिशांवर ताव मारतंय; पण या साऱ्या रणधुमाळीत ‘मानापमान’ नाट्यही पाहायला मिळतंय बरं ! अन् नाराजांची ‘मनधरणी’ करताना उमेदवारांसह नेत्यांची दमछाक होताना दिसतेय.मतदार हा राजा असतो. याची प्रचिती या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या नेत्यांना अन् उमेदवारांना येताना दिसतेय. निवडणुका झाल्या की कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होते. असा साऱ्यांचाच अनुभव मग याचा राग काढण्याची अचूक संधी म्हणजे निवडणूक ! गतवेळी किटलीतून चहा घेऊन आलेल्या एकाला यावेळी कºहाड-पाटणमध्ये त्याची ‘उत्तम’ प्रचिती आली; पण ते सध्या रिंंगणात दिसत नाहीत. हा भागवेगळाच.विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा घड्याळाचा गजर करण्यासाठी मैदानात उतरलेआहेत. मात्र, त्यांचाही कºहाड-पाटणला लोकसंपर्क कमी राहिल्याने आता त्यांना मेळ घालताना कसरत करावी लागतीय. तर प्रमुख विरोधक असणारा सेनेचा उमेदवार नरेंद्र पाटील हे तर नवीन असल्याने त्यांना श्रीगणेशा करावा लागला आहे. ही कसरत करीत असताना कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढताना अनेक वेगळेच अनुभव डोकेदुखी देत आहेत.‘उमेदवार आमचा अन् रुबाब तुमचा’ कशासाठी?उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. मात्र, कºहाड तालुक्यातील प्रचाराची सूत्रे बºयापैकी काँगे्रसच्या हातात दिसतात. त्याबरोबर नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी प्रचाराची बरीच यंत्रणा ही भाजप कार्यकर्त्यांच्या हातात आहे. ही बाब त्या-त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना खटकत आहे. ‘उमेदवार आमचा अन् रुबाब तुमचा’ कशासाठी? अशीच भावना व्यक्त होताना दिसतेय. याची डोकेदुखी उमेदवारांना होतेय.डॉक्टर मोहिते नाराजरेठरे बुद्रुक येथे नुकतीच उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील वाठारकर, अ‍ॅड. आनंदराव पाटील- उंडाळकर यांच्यासह काँगे्रस राष्ट्रवादीचे नेते व्यासपीठावर होते. कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. येथे अविनाशदादा व इंद्रजितबाबा एका व्यासपीठावर येतील, अशी चर्चा होती. मात्र, डॉक्टर मोहितेंनी सभेकडे पाठ फिरवली. त्यांची नाराजी ओळखून पृथ्वीबाबा अन् उदयनराजे त्यांना निवासस्थानी भेटायला गेले; पण नाराजीचे नेमके कारण काय? याबाबत कृष्णाकाठावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.आता कुठे सैनिक प्रचारात सक्रियकोल्हापूरच्या जाहीर सभेत पंतांच्या साक्षीने नरेंद्र पाटलांना सेनेच्या ओट्यात घालण्यात आले. ‘उद्धवा अजब तुझे कौशल्य’ याची प्रचिती आली; पण ओट्यात घेतलेला हा उमेदवार शिवसैनिकांच्या लगेच्या लगेच पचनी पडणार तरी कसा? अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांची तर पाटलांची ओळखही नाही. या साºयांना सामावून घेताना पाटलांना बराच वेळ घालवायला लागला. आता कुठे सैनिक प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसताहेत.जयाभाऊंची मनधरणी होईनासाताºयात ‘आघाडीधर्म’ पाळणाºया काँगे्रसच्या आमदार जयकुमार गोरेंनी माढ्यात मात्र ‘मैत्रीपर्व’ जपण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची ही भूमिका साहजिकच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ‘डोकेदुखी’ ठरतेय. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पृथ्वीबाबा अन् जयाभाऊ यांचा कºहाडात ‘संगम’ झाला. चव्हाणांनी गोरेंना माढ्यातही आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना केल्या खºया; पण राष्ट्रवादीच्या कूरघोड्यांचा पाढा गोरेंनी वाचला. त्यामुळे जयाभाऊंची मनधरणी होईना, अशीच स्थिती आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक