शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:13 IST

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे कधी एकत्र आले तरी बोलत नाहीत. याचा प्रत्यय आता रहिमतपुरातील सिद्धेश्वर पुस्तके यांच्या कार्यक्रमावेळी आला. दोघे शेजारीशेजारी खुर्चीवर तब्बल अर्धा तास बसले होते. मात्र, ऐकमेकांशी ते एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे उत्सुकता ताणलेल्यांची निराशा झाली.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे शनिवारी रात्री पिंपरी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे खुर्चीला खुर्ची लावून बसले होते. हे दोघे ऐकमेकांशी बोलणार का? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मात्र, तसे काही झाले नाही. कारण, गेल्या काही वर्षांपासून रामराजे व जयकुमार गोरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गोरे यांनी संचालक म्हणून सातारा जिल्हा बँकेत शिरकाव केल्यापासून या वादात आणखी भर पडली आहे. संधी मिळताच एकमेकांची उणी-दुणी काढताना अगदी मर्यादाही दोघांकडून ओलांडल्या जात आहेत. रामराजेंनी तर जयकुमार गोरेंवर अनेक बोचऱ्या टीका केल्या आहेत. आमदार गोरे यांनीही जिल्हा बँकेतील नोकर भरतीसह विविध विषयांना हात घालून रामराजेंना अडचणीत आणण्यावर जोर दिला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोघांच्यातून सध्याच्या परिस्थितीत विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे.अशा परिस्थितीत रहिमतपूर येथील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दोघेही खुर्चीला खुर्ची लावून बसले होते. यामुळे उपस्थितांमध्ये आता फलटण अन् माणच्या या दोन नेत्यांच्या तोफा एकमेकांविरोधात जोरदार धडाडतील, अशी खुमासदार चर्चा रंगली होती. मात्र, तब्बल अर्धा तास दोन्ही नेते एकमेकांकडे बघतही नव्हते. तसेच एकमेकांबरोबर चकार शब्दही बोलले नाहीत. परंतु उपस्थितांच्या नजरा मात्र या दोन नेत्यांच्याकडेच रोखल्या होत्या. यावेळी काहींनी तर व्हॉट्सअ‍ॅपवरून गोरे यांना व्यासपीठावरील परिस्थिती आणि उपस्थितांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली.त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेज वाचून गोरे यांनी उपस्थितांकडे एक कटाक्ष टाकून हसून दाद दिली. तर त्याचवेळी त्यांनी यातील काही मेसेज दुसºया बाजूला बसलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांना दाखवले. ते मेसेज वाचून जाधव यांनाही हसू आवरता आले नाही.तर दुसरीकडे रामराजेंच्या बाजूला माजी आमदार शिवाजीराव पाटील हे बसले होते. पाटील वाचनात दंग असल्यामुळे रामराजेंनी काही बोलताच त्यांच्या पलीकडे बसलेले आमदार बाळासाहेब पाटील आपल्या खुर्चीवरून थोडे पुढे सरकून रामराजेंच्या बोलण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत होते. यावेळी माण आणि फलटणचे हे नेते शेजारी बसले असतानाही दोघांची परिस्थिती अवघडल्यासारखी झाल्याचे दिसत होते. तर उपस्थितांचे या दोघांकडे सारे लक्ष होते हे विशेष. पण दोघेही एकमेकांशी शेवटपर्यंत बोलले नाहीत.सत्कारानंतर गोरे व्यासपीठावरून उतरले...कार्यक्रम सुरू होऊन अर्ध्या तासातच आमदार जयकुमार गोरे यांनी पुष्पहार घालून व शाल, श्रीफळ देऊन सिद्धेश्वर पुस्तके यांचा सपत्नीक सत्कार केला. यानंतर ते थेट कार्यक्रमातून बाहेर निघून गेले. आमदार जयकुमार गोरे यांच्या अचानक बाहेर जाण्यामुळे उत्सुकता ताणलेल्या उपस्थितांची निराशा झाली.