शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

रामराजे कडाडले; शिवेंद्रराजेही गरजले !

By admin | Updated: January 12, 2017 23:52 IST

शेंद्रेत राष्ट्रवादी नेते आक्रमक : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ

सातारा : ‘विधानपरिषद निवडणुकीत शेखर गोरे यांच्या पराभवाचा सल मला कायमस्वरुपी टोचत राहणार आहे. सांगलीतल्या विद्यापीठाचा प्रसाद घेऊन राष्ट्रवादीचा घात घालणारे लोक पक्षात नसले तरी चालतील. शेखर गोरेंच्या पराभवाचे उट्टे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काढल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा खा. शरद पवार यांनी दिला. दरम्यान, यावेळी रामराजे कडाडले अन् शिवेंद्रसिंहराजेही गरजले. शेंद्रे, (ता. सातारा) येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण केलेल्या डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या तसेच अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.नोटाबंदीने शेतीमालाचे भाव कोसळले, काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कृषी अर्थव्यवस्था मोडकळीस आली, ३० ते ४० टक्के उत्पादन घटले असून याचा देशातील गरीब लोकांच्या संसारांवर विपरित परिणाम झाला असल्याची जोरदार सरबत्ती करत, ताज्या हाती आलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात ४० कोटी जनता विशेषत: तरूण पिढी आज बँकेच्या लाईनीत उभी असल्याचे जळजळीत वास्तव माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले.या कार्यक्रमाला जिल्हाभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. याचवेळी खा. शरद पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री टीव्ही चॅनेलवरुन अस्तित्वातील चलन रद्द करण्याचा हुकूम काढला. या हुकमाचे दुष्परिणाम दीर्घकाळ भारतातील जनतेला सोसावे लागतील, हा अंदाज ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी माझ्याजवळ व्यक्त केला होता. हा अंदाज सपशेल खरा ठरला आहे. ‘कृषी मालाचे दर गडगडले आहेत. संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली. उद्योगांतील रोजगार संपले. लाखो लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे माझ्या मते मोदींचा हा हुकूम म्हणजे ‘आॅपरेशन सक्सेसफूल, बट पेशंट डेड,’असाच ठरला आहे,’ अशी खरपूस टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी सातारा येथे केली. अजिंक्यतारा सहकारी कारखाना डिस्टिलरी व इथेनॉल प्लॅन्टच्या आधुनिकीकरणाचा आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उदघाटन खा. पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर पवार यांनी टीका केली. मोदींच्या निर्णयाचे दुष्परिणाम मोठा काळ सामान्य जनतेला सोसावे लागणार असून हाच मुद्दा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामान्य लोकांना जागृत करा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. खा. पवार म्हणाले, ‘काळा पैसा ही अर्थव्यवस्थेची समस्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत देशातील ८६ टक्के चलन रद्द करण्याचा हुकुम काढला. मला सुरुवातीला वाटलं, हा निर्णय चांगला ठरेल. मी दिल्लीत ज्या ठिकाणी राहतो, तिथेच एक बंगला सोडून देशाचे माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग हेही राहतात. या निर्णयानंतर मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करुन याचा फटका सुरुवातीला शेतीमालाला बसेल, असे स्पष्ट केले. मी नाशिकला गेलो होतो, कांदा उत्पादक रडवेला झाला आहे. ठाण्यात हिरव्या पालेभाज्या रस्त्यावर फेकाव्या लागल्या. साताऱ्यात हळद, आले या पिकांचे भाव ढासळले. भाज्यांचे दर कमी झाले म्हणूनच नव्हे तर ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच नोटाबंदीचा आदेश काढत जिल्हा मध्यवर्ती बँकांवरही निर्बंध घातले गेल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक झाली. त्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढा द्यावा लागला. त्यात जिल्हा बँका यशस्वी ठरल्या.नोटाबंदीच्या निर्णयाची सर्वाधिक झळ शेतकऱ्यांना बसल्याचे स्पष्ट करत, आम्ही शेतकऱ्यांचा विचार करणारे नव्हे, तर ग्राहकांचे हित पाहणारे आहोत हे राज्यातील व केंद्रातील सरकारने दाखवून दिले असल्याची टीका रामराजे नाईक- निंबाळकर यांनी यावेळी आपल्या भाषणात केली. सत्तेच्या हव्यासातून पक्षात आलेल्या, परंतु विरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेची परवानगी द्या, असे ते शरद पवार यांना उद्देशून म्हणाले. सत्ता नसतानाही हा जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहतो, इथल्या तिथल्या उंदरांमुळे ही तटबंदी कोसळणार नाही हे अशा लोकांना आणि सत्ताधीशांना कळू द्या अशी साद त्यांनी घातली. नगरपालिका निवडणुकीतील यशाने भाजपमध्ये न्यूनगंड निर्माण झाल्याचे टीकास्त्र आमदार शशिकांत शिंदे यांनी डागले. १९९९ मध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने या जिल्ह्यात इतिहास घडवला, त्याच पध्दतीने एकजुटीने यश मिळवून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्याचे आवाहन त्यांनी कार्यकत्र्यांना केले. एक कॉलर वर करतो .. तर दुसरा विजार !विश्वासघातकी लोकांना आम्ही जागा दाखवून देऊ, असे म्हणत रामराजेंनी उदयनराजे व जयकुमार गोरे यांचे नाव न घेता ‘एक कॉलर वर करतो, तर दुसरा विजार,’ अशी जहाल टीका केली. राजकारणात नवीन संस्कृती उदयाला आली असून या विचारवंतांना घरी बसविण्याची वेळ आली असल्याचेही रामराजेंनी स्पष्ट केले.शिवसेनेनेच मोदींच्या भूमिकेवर आसूड ओढलाशरद पवार यांनी आपल्या भाषणात नोटाबंदीच्या मुद्यावरून मोदी सरकारचा समाचार घेताना शिवसेना व सामनाची आवर्जून दखल घेतली. नोटाबंदीची घोषणा करताना पंतप्रधान मोदी यांनी 'मला फक्त ५० दिवस द्या, त्या अवधीत परिस्थिती न सुधारल्यास मला कोणतीही शिक्षा द्या' असे म्हटले होते. हे ५० दिवस संपल्यानंतर भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या व सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने आसूड ओढल्याचे शरद पवार यांनी लक्ष वेधले.कॉलर टाईट आता एकदाच : रामराजेज्यांनी पैसे घेऊन राष्ट्रवादीविरोधात मते दिली, त्यांच्या घरावरील सोन्याची कवले आम्हाला बघायची आहेत. शेखर गोरे यांचा पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणातील काळी घटना आहे. कॉलर टाईट करणाऱ्यांची स्टाईल सातारा पालिकेत चालली. मात्र ती एकदाच! राष्ट्रवादीच्या माध्यमातून पद मिळविणाऱ्यांना हा जिल्हा आपला गुलाम आहे, असे वाटू लागले आहे. मत तुमचं आणि मदत तिसऱ्यालाच, असे करणाऱ्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. राजेपद हे जन्माने नाही तर गुणांनी येते, अशी टीका खा. उदयनराजेंचे नाव न घेता रामराजेंनी केली. आता दोन हात करणार : शिवेंद्रराजेराष्ट्रवादीच्या माध्यमातून पद मिळवायचे. पक्षाच्या व्यासपीठावर थाटात बसायचं आणि खाली उतरताच आपण पक्षनिष्ठा मानत नाही, अशी भूमिका घ्यायची, त्यांना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे. हेच लोक माझ्याविरोधात पवार साहेबांकडे तक्रार करु शकतात, त्या साहेबांनी मनावर घेऊ नयेत, संघर्षाला आता मी कमी पडणार नाही. आता दोन हात करणार, असे हल्ला आ. शिवेंद्रसिंहराजेंनी चढवला.बाबाराजेंच्या हाती तलवार द्या : शिंदेशिवेंद्रसिंहराजेंच्या हाती तलवार द्यावी, अशी तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे. १९९९ चा इतिहास आम्ही जागा करु. केंद्र व राज्यातील आपले सरकार जाऊनही सातारा जिल्ह्यात ५ नगरपालिका व ५ नगरपंचायतींत राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. काही लोक पक्ष सोडून जात आहेत. आता प्रामाणिक कार्यकर्त्यांची परीक्षा आहे, असे मत आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.उदयनराजेंविरोधात जाहीर नाराजीखासदार उदयनराजे भोसले यांनी ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. पवार यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बळ देण्याची जाहीर मागणी देखील यावेळी करण्यात आली.विधान परिषदेचा हिशेब चुकता कराविधान परिषदेच्या सातारा - सांगली मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांचा पराभव आपल्या जिव्हारी लागल्याचे शरद पवार यांनी भाषणात दोन - तीन वेळा बोलून दाखवले. येथे मतदार जास्त असूनही आपल्याच काही लोकांनी विरोधी उमेदवाराकडून 'प्रसाद' घेऊन विरोधी मतदान केल्याने हा पराभव झाल्याचे सांगून यांना जिल्हा परिषद निवडणुकीत बस म्हणण्याचा अधिकार वापरा, असे पवार यांनी रामराजेंना सांगितले.