शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदी राजू भोसले

By admin | Updated: December 28, 2016 00:49 IST

चारजण स्वीकृत नगरसेवक : शिवेंद्रसिंहराजेंच्या आघडीतून अतुल चव्हाण यांना संधी

सातारा : साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक राजू भोसले यांची निवड झाली असून मंगळवारी दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. तसेच सातारा विकास आघाडीकडून अ‍ॅड. दत्ता बनकर, धनश्री महाडिक तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या आघाडीतील अतुल चव्हाण आणि भाजपकडून अ‍ॅड. प्रशांत खामकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली.नगराध्यक्षा माधवी कदम यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी मंगळवारी (दि. २७) विशेष सभा बोलावली होती. सकाळी नामनिर्देशनपत्रे दाखल करून घेतली गेली. या निवडणुकीत नगरविकास आघाडीही उडी घेईल, अशी शक्यता होती; परंतु ‘नविआ’ ने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवक राजू भोसले यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी निश्चित केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. ते अखेर खरे ठरले.खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडीवेळी उपस्थित राहून सर्व नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार केला. विरोधी पक्षनेते म्हणून नगर विकास आघाडीचे अशोक मोने यांची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी) ‘नविआ’त चव्हाण यांना संधी !आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीतील अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाण्याची चर्चा होती.मात्र सातारच्या राजकारणात फारसे चर्चेत नसलेले अतुल चव्हाण यांच्या नावावर आघाडीकडून शिक्कामोर्तब झाले. शिवेंद्रसिंराजेंच्या आघाडीतील काही अनुभवी नगरसेवकच पालिकेत नसल्याने सभागृहात आघाडीची भूमिका मांडण्याची जबाबदारी आता नगरसेवक अशोक मोने यांच्यावर आली आहे.‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेगेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, यावर चर्चा होत होती. मात्र मंगळवारी ‘लोकमत’ने उपनगराध्यक्षांच्या नावासह स्वीकृत नगरसेवकांचीही नावे जाहीर केली होती. त्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले. त्यामुळे अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.