शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजेंचे मनोमिलन; कार्यकर्त्यांना रुचेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:11 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेले मनोमिलन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचेच चित्र ...

सातारा : लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेले मनोमिलन दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रुचले नसल्याचेच चित्र पाहायला मिळाले. मनोमिलनाच्या आणाभाका घेऊन देखील शहरामध्ये दोन्ही आघाड्यांची संघटित शक्ती पाहायला मिळाली नाही.उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सातारा शहरातील कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन उदयनराजे भोसले यांच्या नावाला विरोध केला होता. तरीही उदयनराजेंनाच उमेदवारी दिली गेली. यानंतर फेरमनोमिलनाचा मेळावा झाला. या मेळाव्याला दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर सर्वजण एकत्रितपणे कामाला लागतील, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. शहरातील नगरविकास आघाडीच्या ठराविक कार्यकर्त्यांनीच प्रचारात सहभाग घेतला.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र सातारा शहरासह ग्रामीण भागात उदयनराजेंसाठी लोकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. शहरात काढलेल्या प्रचारफेऱ्यांत त्यांच्यासोबत सातारा विकास आघाडीचे सदस्यच पाहायला मिळाले. मात्र, नगरविकास आघाडीची मंडळी अलिप्त राहिल्याचे चित्र होते. तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये शिवेंद्रसिंहराजेंनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.ग्रामीण भागातूनही उदयनराजेंना मताधिक्य देण्याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्यांना शिवेंद्रसिंहराजेंनी सूचना केल्या होत्या. जिल्हा परिषदेचे ५ गट तर ११ गण शिवेंद्रसिंहराजे यांच्या ताब्यात आहेत. ३ गट ७ गण उदयनराजे यांच्या ताब्यात आहेत. ग्रामीण भागातून राष्ट्रवादीसाठी कार्यकर्ते फिरले.वर्णे गटातील भाजपचे सदस्य मनोज घोरपडे हे कºहाड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीच्या नरेंद्र पाटील यांना आपल्या भागातून मतांची आघाडी देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. दोन्ही राजेंनी पूवी्रचे वाद विसरून एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उदयनराजेंच्या प्रचारासाठी दोन्ही आघाड्यांची संघटित शक्ती दिसायला हवी होती. मात्र तशी दिसली नाही. शहरात मतदान प्रक्रिया सुरू असतानाही साविआचे बरेच नगरसेवक हातचा राखून काम करताना दिसले.वनवासवाडीतून उदयनराजेंचा प्रचारखासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप शिंदे यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यांच्या पत्नी रेश्मा शिंदे वनवासवाडी गटातून भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेल्या आहेत. संदीप शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात उतरलेले पाहायला मिळाले.