शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज गायकवाडला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 00:52 IST

६़५ कोटी गंडविल्याचे प्रकरण : पोलिसांकडून कसून तपास

बिदर : गुंतवणुकीतून मोठा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकातील भालकी उपविभागातील शेतकऱ्यांना ६़५ कोटी रुपयांना गंडविणारा आरोपी राज गायकवाड यास औराद बाऱ्हाळी तालुका न्यायालयाने मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत़ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील राज गणपतराव गायकवाड याने बीदर जिल्ह्यातील भालकी आणि औराद बाऱ्हाळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण शेळीपालन व्यवसायासाठी मोठे गुंतवणूकदार आहोत, अशी थाप मारुन या व्यवसायात गुंतवणूक केल्यास १४ महिन्यांत ८० टक्के फायद्यासह मुळ रक्कम देण्याचे आमिष दाखविले़ भालकी आणि औराद बाऱ्हाळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आपल्या व्यवसायाची माहिती दिली़ अल्प काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असल्याचे पाहून या दोन्ही तालुक्यांतील २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली़ दरम्यान, मुदत संपल्यानंतर काही शेतकऱ्यांनी फायदा आणि मूळ अनामत रक्कम मिळावी म्हणून राज गायकवाड याचा शोध घेण्यास सुरुवात केली़ मात्र तो सापडत नसल्याचे पाहून अखेर या शेतकऱ्यांनी संतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली़ याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी गायकवाड याचा शोध घेऊन सांगली येथून अटक केली़ त्यास मंगळवारी तालुका न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे़ प्राथमिक चौकशीत या भागातील २०० शेतकऱ्यांना ६़५ कोटीस गायकवाड याने गंडविले असल्याचे निदर्शनास आले आहे़ या प्रकरणाचा कसून तपास सुरु असून आणखीन काही जणांना गंडविल्याचे शेतकरी सांगत आहेत़ त्यामुळे ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे, असे संतपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़