शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!

By admin | Updated: July 7, 2016 00:51 IST

‘चांदोबाचा लिंब’मध्ये उभे रिंगण : टाळ-मृदंगांच्या गजरात ‘माउली’ तरडगावी मुक्कामी

राहिद सय्यद/बाळासाहेब बोचरे --तरडगाव टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी आपल्या डोळ्यांत साठविला.लोणंद येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून माउलींचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी एक वाजता खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यातील तरडगावकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, तालुक्याच्या सीमेवर सरहद्देचा ओढा येथे दुपारी अडीच वाजता आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती वैशाली गावडे, उपसभापती दिलीप अडसूळ, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार विजय पाटील, दत्ता अनपट, स्वाती भोईटे, वसंतराव गायकवाड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.आजच्या दिवसाचे आकर्षण म्हणजे चांदोबाचा लिंब येथे होणारे उभे रिंगण परिसरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावला होता़ आजूबाजूच्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने हरीचा खेळ पाहण्यासाठी आले होते़ माऊलींची पालखी येण्यापूर्वीच रिमझिम पावसाने सडा टाकला होता़ त्यावर राजश्री जुन्नरकर तसेच पुण्याच्या समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी रांगोळ्या काढल्या होत्या़ ३़३० वाजता रिंगणस्थळी अश्व आले़ ४ वाजता माऊलींचा रथ आला़ रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांनी कौशल्याने रिंगण लावले. प्रचंड रेटारेटी असल्याने रिंगणाला मर्यादा आल्या होत्या़ पखवाज आणि टाळांचा खणखणाट चालू होता़ मुखातून ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष सुरू होता़ अशा तल्लीन झालेल्या वातावरणात दोन्ही अश्वांना रिंगणात सोडून देताच अश्वांनी वाऱ्याच्या वेगाने दौडण्यास सुरुवात केली़ त्यावेळी अवघा आसमंत ‘माऊली माऊली’च्या आरोळ्यांनी दुमदुमून गेला होता़ मिनिटभराच्या या खेळाने लाखो नेत्र सुखावले़ त्यानंतर आरती करून बाळासाहेब चोपदारांनी दिंडीकऱ्यांना उडीच्या खेळास आमंत्रण दिले़ हरीच्या खेळाने आनंदित झालेल्या दिंड्या-दिंड्यांमध्ये विविध खेळ सुरू झाले़ नाचत-नाचतच हा सोहळा रात्री तरडगावच्या मुक्कामी गेला़ उद्या पालखी फलटण नगरीत मुक्कामी जाणार आहे़अश्वाच्या धक्क्यानेआरफळकर जखमी अपुऱ्या जागेत लावलेल्या रिंगणात अश्वांना दौडण्यास पुरेशी जागा नव्हती़ त्यामुळे दौडताना मालक राजाभाऊ आरफळकर यांना अश्वाचा धक्का लागल्याने ते खाली पडले़ त्यांना तातडीने फलटणच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले़