मलकापूर : मलकापुरात चक्रीवादळासह पावसाने सोमवारी थैमान घातले. शहरातील आगाशिवनगर झोपडपट्टीत दहा घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. बागलवस्तीसह अयोध्या कॉलनीत झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्याने चोवीस तास वीज पुरवठा खंडित झाला आहे, तर नांदलापूर व कापिल गोळेश्वर परिसरात वीज खांब पडल्यामुळे विद्युतवाहक तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचे पीक भुईसपाट झाले आहे.
परिसरात रविवारी सकाळपासूनच जोरदार चक्रीवादळासह संततधार पावसाने हजेरी लावली. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील आगाशिवनगर झोपडपट्टीत दहा ते पंधरा घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. संततधार पावसाने वैशाली पाटणकर, सतीश जावळे, पिंटू जावळे, महेश सोनवले, रमेश लाखे, विजय लाखे, बयनाबाई कुडाळकर, किरण लाखे, दशरथ पाटणकर, झिगाबाई जावळे, सुभाष लाखे, अमित सकट, विकी लाखे यांच्या घरातील संसारोपयोगी सहित्य भिजल्याने नुकसान झाले. शहरात बागलवस्ती येथे दोन ठिकाणी, तर अयोध्या कॉलनीत वाऱ्याने झाडांच्या फांद्या विद्युतधारांवर पडल्यामुळे मलकापुरातील काही भागांत चोवीस तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे हाल झाले.
नांदलापूर परिसरात तीन, तर गोळेश्वर परिसरात दोन विद्युत खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. सोमवारी सकाळपर्यंत पडलेल्या संततधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. या वादळी वाऱ्याने उसाचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. त्याचबरोबर मलकापूर, कापील, जखीणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांचे मांडाव पडल्यामुळे नुकसान झाले आहे.
चौकट
पाणीपुरवठा योजनेलाही फटका
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी खांब पडल्यामुळे मलकापूर चोवीस तास पाणीपुरवठा योजनेस पाणी उचलण्यात अडचणी आल्यामुळे शहराला होणारा चोवीस तास पाणीपुरवठा अनेक वेळा खंडित झाला होता. पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन करीत कमी दाबाने का होईना पाणीपुरवठा सुरू ठेवला होता.
कोट
वादळी वाऱ्याने काही ठिकाणी झाडाच्या फांद्या मोडून वीज वाहक तारांवर पडल्याने तारा तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर काही ठिकाणी खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णालय आहे प्राधान्याने त्या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. उर्वरित भागांतही दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- यु. आर. धर्मे
शाखा अभियंता, मलकापूर
फोटो
मलकापुरात सोमवारी चक्रीवादळासह संततधार पावसाने थैमान घातले. आगाशिवनगर झोपडपट्टीत तेरा घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. (छाया : माणिक डोंगरे).
===Photopath===
170521\img_20210517_160403.jpg~170521\img_20210517_160342.jpg
===Caption===
मलकापूरात चक्रिवादळासह सततधार पावसाचे थैमान घातले. आगाशिवनगर झोपडपट्टीत तेरा घरांची पत्री उडाल्याने संसार उघड्यावरपडले आहेत. ( छाया माणिक डोंगरे)~मलकापूरात चक्रिवादळासह सततधार पावसाचे थैमान घातले. आगाशिवनगर झोपडपट्टीत तेरा घरांची पत्री उडाल्याने संसार उघड्यावरपडले आहेत. ( छाया माणिक डोंगरे)