शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साताºयातील शेकडो घरे अन् दुकानांमध्ये पावसाचे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 18:49 IST

सातारा : साताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला.

ठळक मुद्दे वाहनांचे नुकसान; संसारोपयोगी वस्तू पाण्याच्या प्रवाहातसाताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसाने निम्मे शोरुम पाण्यात गेले होते. रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकी पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला. ओढ्याचे पाणी शेकडो घरे, पन्नासहून अधिक दुकानांमध्ये शिरल्याने संस्कारोपयोगी वस्तू, दुकानातील साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अनेक गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.साताºयातील नैसर्गिक ओढ्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. ओढ्यांचा प्रवाह अडवून वसाहती बांधल्या आहेत. त्याचा परिणाम सातारकरांना दरवर्षी सहन करावा लागतो. साताºयात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.गोडोली, सदरबझार येथील ओढे तुंबल्याने ओढ्यांचे पाणी लोकवस्तीत शिरले. गोडोली तळ्याशेजारील शंभरहून अधिक घरे तसेच पन्नासहून अधिक दुकानांमध्ये कमरे एवढे पाणी साठले होते. अचानक पाणी वाढू लागल्याने नागरिकांना काय करावे, हेच कळेना. मिळेल त्या साधनांचा वापर करून पाणी काढण्याचा काही काळ प्रयत्न झाला. परंतु, पाणी वाढत होते. तळघरात असलेल्या दुकानांचे यामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांनी संसारोपयोगी वस्तू घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेणे पसंत केले.सोमंथळी पूल वाहून गेलाफलटण तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण-बारामती रस्त्यावरील सोमंथळी येथील पूल रात्री उशिरा वाहून गेला. त्यामुळे तो वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.